दुष्काळाच्या झळांनी होरपळतोय अवघा मराठवाडा....

http://i.dailymail.co.uk/i/pix/2013/01/20/article-2265554-170F0D42000005DC-171_468x465.jpg

पंढरपूर लाईव्ह- 

नेहमीच दुष्काळाच्या झळा सोसणारा, शेती हेच उत्पन्नाचे स्त्रोत असणारा मराठवाडा सध्या दुष्काळाच्या झळांनी होरपळतो आहे....

मराठवाडा व विदर्भाला दर तीन वर्षांनी एकदा दुष्काळाचा सामना करावा लागतो. पण दुष्काळी वर्षांतील खरीप वा रब्बीचे उत्पन्न हाती लागत असल्यामुळे शेतकरी तो ताण सहन करू शकत असे. यंदा मात्र १९७२ च्या दुष्काळानंतर प्रथमच एवढय़ा कमी पावसाचा फटका राज्याला सहन करावा लागत असून लातूर, उस्मानाबाद या दोन जिल्ह्य़ांत खरिपाच्या उत्पन्नात ५० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. 

                  रब्बीचा हंगाम तर १०० टक्के हातातून गेला आहे. गेल्या वर्षी या दोन्ही जिल्हय़ांना गतवर्षी मार्च, एप्रिल असे दोन महिने गारपिटीशी सामना करावा लागला होता. त्यामुळे तेव्हा रब्बीचे पीक हातचे गेले. या वर्षी खरीप हातचा गेला तर रब्बी साथ देईल, असे वाटले होते. पण पावसाने त्या आशेवरही पाणी पडले. आतापासूनच शेत पुरते बोडके झाल्यामुळे जून महिन्यापर्यंत करायचे काय, हा प्रश्न आ वासून उभा आहे. शेतीच्या उत्पन्नावरच गावगाडा चालतो. ते उत्पन्नच बंद असल्यामुळे गावगाडय़ाचे अर्थचक्रही कोलमडले आहे.
  •  
  • *राज्यातील २५ हून अधिक जिल्ह्य़ांना कमी पावसाचा फटका
    *मराठवाडय़ातील दोन जिल्ह्य़ांत
  • तीव्र अवर्षण
    *जनावरे कत्तलखान्याच्या वाटेवर
    *शेतकरी कर्जाच्या विळख्यात
  • मराठवाडय़ातील पीकस्थिती
    *खरिपाचे क्षेत्र - ४६ लाख ८७ हजार हेक्टर
    *खरीप पिके -  सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, तीळ, मका, संकरित ज्वारी आदी
    *दुबार पेरणी - पावसाअभावी १५ हजार हेक्टरवर
    *उत्पन्नात घट - ५० टक्के
    *रब्बीचे क्षेत्र - १७ लाख ३८ हजार हेक्टर
    *रब्बी पिके - गहू, हरभरा, करडई, सूर्यफूल, ज्वारी आदी
    *पेरणी - ३ लाख ६१ हजार हेक्टरवर. केवळ २०.७७ टक्के

http://media2.intoday.in/indiatoday/images/stories/water_350_012513101948.jpg मराठवाडय़ातील अनेक गावांमध्ये अवर्षणाने कहर केला असून, कमी पावसाच्या फटक्यामुळे अवघा गावगाडाच ठप्प झाला आहे. बदललेल्या ऋतुचक्रामुळे ग्रामीण अर्थचक्र पूर्णत: कोलमडून पडले आहे. मराठवाडा, पश्चिम विदर्भाबरोबरच या वर्षी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही वेळेवर आणि पुरेसा पाऊस झालेला नाही. त्याचा फटका राज्यातील २५हून अधिक जिल्हय़ांना बसला आहे.
                    
                   या वर्षी वार्षकि सरासरीच्या ५० ते ६० टक्केच पाऊस पडल्याने नोव्हेंबरमध्येच पाणीपातळीत दोन मीटरपासून चार मीटपर्यंत घट झाली आहे. परिणामी, जानेवारीपासूनच पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची पाळी अनेक गावांमध्ये येईल. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न अतिशय भीषण होणार असून जनावरांच्या बाजारात मोठय़ा प्रमाणात जनावरे विक्रीसाठी येत आहेत. तेथे खरेदी अर्थातच कत्तलखान्यांसाठी होत असल्याचे सांगण्यात येते.
पेरले ते गेले..
औरंगाबाद जिल्हय़ात सहा लाख ६३४, जालन्यात सहा लाख १७२, परभणीत पाच लाख १८०, िहगोलीत तीन लाख ८७५, नांदेड सात लाख, बीड सात लाख ७०६, लातूर पाच लाख ६०८, तर उस्मानाबाद जिल्हय़ात चार लाख ८९० हेक्टरवर खरिपाचा पेरा झाला. जूनमध्ये वेळेवर पाऊस झाला नाही. जुलत तो काही ठिकाणीच झाला. त्यामुळे पेरणी झाली, पण सुमारे १५ हजार हेक्टरवर पेरलेले उगवलेच नाही. तेथे पुन्हा पेरावे लागले. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे सर्वच पिकांच्या उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट झाली.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी
विविध उद्योजक, व्यापारी व संस्था आता आपल्या जाहिराती पंढरपूर लाईव्हसाठी देवू शकतात...

तसेच वाढदिवस वगैरे शुभेच्छा जाहिराती व विविध समारंभाच्या आमंत्रणाच्या जाहिराती सुध्दा आपण पंढरपूर लाईव्ह वर देवू शकता...

आपल्या जाहिराती पाठविण्यासाठी
खालील ई-मेल आय डी वर संपर्क साधावा...

 

livepandharpur@gmail.com

 

jhanjavat@gmail.com

 

मोबा. 8055434499

8308838111
8552823399
 

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पंढरपूरचे  पहिले ई-न्यूज पोर्टल ‘पंढरपूर लाईव्ह’ साठी महाराष्ट्राच्या कानाकोर्‍यातून विविध भागातील ताज्या  बातम्या पाठविणेसाठी प्रतिनिधी नेमणे आहेत...  या क्षेत्रात काम करण्याची व जनसंपर्काची आवड असणार्‍या तरुण-तरुणींनी अवश्य संपर्क साधावा...


-संपादक

भगवान गणपतराव वानखेडे

सा.झंझावात,

पंढरपूर लाईव्ह

मोबा. 8055434499

8308838111

8552823399


कृपया इच्छूकांनी आपले अर्ज आणि पासपोर्ट साईज फोटो आपल्या संपुर्ण बायोडाटासह


livepandharpur@gmail.com

 

jhanjavat@gmail.com

 या मेल आय डी वर ई-मेल करावेत.

ताज्या घडामोडी साठी बघत रहा....

 

www.pandharpurlive.com

 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments