मुंबई : अभिनेता शाहरुख खानची प्रचंड गाजलेली 'फौजी' ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 9 नोव्हेंबरपासून संध्याकाळी साडेसात वाजता 'झी लम्हे' या चॅनलवर ही मालिका प्रसारित केली जाणार आहे.
न्यू फिल्म अॅडिक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने या मालिकेची निर्मिती केली होती. तर कर्नल राज कपूर यांनी 'फौजी'चं दिग्दर्शन केलं होतं. आता तब्बल 25 वर्षांनंतर ही मालिका आणि त्यातील शाहरुख पुन्हा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
डीडी नॅशनल चॅनलवर 1989 साली आलेल्या 'फौजी' मालिकेने छोट्या पडद्यावर धूम माजवली होती. भारतीय लष्कराच्या कमांडोचं ट्रेनिंग कसं असतं, यावर ही मालिका आधारित होती.
या मालिकेत शाहरुख खानने अभिमन्यू रायची भूमिका साकारली होती. अभिमन्यू राय हे पात्र भारतीय लष्काराच्या बॉम्बे सॅपरचे लेफ्टनंट कर्नल संजॉय बॅनर्जी यांच्यावर आधारित होतं.
'फौजी' ही शाहरुख खानची पहिली टीव्ही सीरिअल म्हणून माहित असलं तरी तसं नाही. 'दिल दरिया' मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर एण्ट्री केली होती. मात्र त्यातील शाहरुखची भूमिका फारशी लक्षात राहिली नाही. मात्र त्यानंतर आलेल्या 'फौजी'ने शाहरुखला ओळख मिळवून दिली आणि आता तो बॉलिवूडचा 'बादशाह' म्हणून ओळखला जातो.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी
विविध उद्योजक, व्यापारी व संस्था आता आपल्या जाहिराती पंढरपूर लाईव्हसाठी देवू शकतात...
तसेच वाढदिवस वगैरे शुभेच्छा जाहिराती व विविध समारंभाच्या आमंत्रणाच्या जाहिराती सुध्दा आपण पंढरपूर लाईव्ह वर देवू शकता...
आपल्या जाहिराती पाठविण्यासाठी
खालील ई-मेल आय डी वर संपर्क साधावा...
livepandharpur@gmail.com
jhanjavat@gmail.com
मोबा. 8055434499
8308838111
8552823399
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पंढरपूरचे पहिले ई-न्यूज पोर्टल ‘पंढरपूर लाईव्ह’ साठी महाराष्ट्राच्या कानाकोर्यातून विविध भागातील ताज्या बातम्या पाठविणेसाठी प्रतिनिधी नेमणे आहेत... या क्षेत्रात काम करण्याची व जनसंपर्काची आवड असणार्या तरुण-तरुणींनी अवश्य संपर्क साधावा...
-संपादक
भगवान गणपतराव वानखेडे
सा.झंझावात,
पंढरपूर लाईव्ह
मोबा. 8055434499
8308838111
8552823399
कृपया इच्छूकांनी आपले अर्ज आणि पासपोर्ट साईज फोटो आपल्या संपुर्ण बायोडाटासह
livepandharpur@gmail.com
jhanjavat@gmail.com
या मेल आय डी वर ई-मेल करावेत.
ताज्या घडामोडी साठी बघत रहा....
www.pandharpurlive.com
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


0 Comments