अस काय घडल कि ज्याने शिवसेनेला उतरती कळा लागली ! स्व.बाळासाहेबांचे गुण उद्धवसाहेब तुमच्यामध्ये नाहीत ?

shiv-sens-pti_021612091058.jpg प्रदर्शित करत आहे

  • पंढरपूर लाईव्ह साठी-शंतनु शेळके               यांचेकडून खास लेख...

    उद्धव यांनी टर्निंग वळण कुठे गमावलं.

  • * मिशन-१५० चा बालहट्ट उद्धवना नडला.

  • * सत्तेसाठी आजही शिवसेना आशावादी.

  • * शपथविधीला गेल्यानेच अर्धा खेळ संपला.

  • * शरद पवार यांनी केली पावर खेळी. 

    * राजकारण कराव तर.......


                शिवसेनाप्रमुख हे नाव जरी मराठी माणसाच्या ओठावर आले कि त्याचे रक्त सळसळत असे ते व्यक्तिमहत्व.पण देवाने आमचा देवच चोरला अशी म्हनटण्याची वेळ शिवसैनिकांवर आली आणि संपूर्ण मुंबईसह राज्यात काळा दिवस ठरला तो म्हणजे बाळासाहेबांच्या निधनाचा अर्थात १९ नोव्हें, २०१२.पण आज बाळासाहेबानंतर ज्याच्या स्वाधीन हा पक्ष गेला ते उद्धव बाळासाहेब ठाकरे.पण बालासाहेबांमध्ये जे गुण होते जी बोलण्याची,चालण्याची,नजरेची जी अदा होती ती उद्धव यांच्या मध्ये नाही असच आता वाटू लागल आहे.कारण बाळासाहेबांची एक अदा अशी होती जी सर्व शिवसैनिकांना फिदा करत होती.ती म्हणजे कधीच कोणत्या कार्यकर्त्याला नाराज न करणे. पण उद्धव यांच्यात हा गुण आहे पण उलटा म्हणजे बाळासाहेब नाराज करत न्हव्ते उद्धव नाराज करत आहेत.
   
            लोकसभेनंतर शिवसेनेला एकंदरीत चांगले वातावरण होते असे म्हणायला काही हरकत नाही.कारण मोदी यांच्या वादळात शिवसेनेचे एकाच झटक्यात १८ खासदार निवडून आले.त्यावेळी खरतर शिवसेनेची परिस्थिती झाकली मुठ सव्वा लाखाची अशीच होती.पण याचा खरा कस लागणार होता तो विधानसभेमध्ये.विशेष: युती तुटल्यामुळे उद्धव काय करतात हे त्यांच्या जीवनातले सर्वात महत्वाचे टर्निंग वळण होते.पण त्याचवेळी सर्वात मोठी आणि पहिली चूक उद्धव यांनी केली ती म्हणजे आपल्या चिरंजीवाच्या अर्थात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या  बालहट्टाच्या नादी लागून उद्धव आपले राजकीय शहाणपण गमावून बसले.भाजपसोबत चर्चा करण्यासाठीही आदित्य यांना पाठवण्यात आले.  ती होती दुसरी चूक. रंगशारदामध्ये आप देनेवाला नाही आप लेनेवाला हो असा सणसणीत टोला भाजपला उद्धव यांनी लगावला.त्यावेळी शिवसैनिकांची छाती अभिमानाने खुलली होती पण.....
      
               पुढच्या काळात या ढाण्या वाघाच राजकीय नृत्य ढासळत गेल. ते म्हणजे यामुळे अमित शहा मुंबईत आले पण ते मातोश्रीवर जाणार कि नाही याबाबत चर्चा सुरु असतानाच उद्धव यांनी अमित शहा यांना फोन केला आणि मग काय अर्धी लढाई तिथेच थांबली.  काही झाल तरी दिल्लीपुढे झुकणार नाही...शपथविधीला जाणार नाही...हे बोल होते उद्धव यांचे पण अचानक अस काय झाल कि उद्धव पूर्णच पलटले आणि थेट एका फोनवर भाजपनेत्यांच्या बाजूला जाऊन कसे बसले.हे शिवसैनिकांनासुद्धा कळालेलं नाहीये.भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची अफजलखाणासोबत केलेली तुलना एकदिवस आपल्यालाच वाघनख्यानसारखी आपणालाच येउन बोचेल याच जराही भान उद्धव यांना नसाव कदाचित.१९८५ साली शिवसेनेचा एक आमदार निवडून आला होता तो म्हणजे छगन भुजबळ त्या एका आमदाराच्या जीवावर बाळासाहेबांचा दरारा त्यावेळी खूप मोठा होता त्या दराराने सत्तेत असणारा पक्षही घाबरायचा.पण उद्धव यांच्याकडे १८ खासदार असून त्याचा फायदा काय ? उद्धव यांनी त्या १८ खासदारांच्या जीवावर त्यांचा दबदबा किती असायला हवा होता. हे त्यांना लवकर कळावं हीच अपेक्षा......

          .....................................................................................................................................

उगीच राजकारणातला पॉवरमन म्हणत नाहीत........

  • सत्तेत भाजपला पाठींबा द्यायचा का नाही यावरून जो अभूतपूर्व गोंधळ झाला त्यावरून बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक मनापासून दुखवला.हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही भाजपला पाठींबा देणार किंवा सन्मानाने विरोधात बसणार यापैकी एक निर्णय सेनेने झटकन घ्यायला हवा होता.शिवसेनेच्या या गोंधळाचा फायदा घेत राजकारणातील चाणक्य माणूस अर्थात ज्यांना आपण राजकारणातील पॉवरमन म्हणतो ते म्हणजे शरद पवार यांनी आपल्या पावर खेळी पवार यांनी केली आणि विरोधी पक्षनेता जाहीर झाला तरी शिवसेनेचा अजूनही दोन दगडावरती पाय आहे.कारण सत्तेसाठी सेना अजूनही आशावादी आहे.....

     

      .....................................................................................................................................  

    आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी...  विविध उद्योजक, व्यापारी व संस्था आता आपल्या जाहिराती पंढरपूर लाईव्हसाठी देवू शकतात... तसेच वाढदिवस वगैरे शुभेच्छा जाहिराती व विविध समारंभाच्या आमंत्रणाच्या जाहिराती सुध्दा आपण पंढरपूर लाईव्ह वर देवू शकता...

    आपल्या जाहिराती पाठविण्यासाठी

    खालील ई-मेल आय डी वर संपर्क साधावा...

    livepandharpur@gmail.com                  jhanjavat@gmail.com

      मोबा. 8055434499,  8308838111,  8552823399 

    -----------------------------------------------------------------------------------------------------------------------

    पंढरपूरचे  पहिले ई-न्यूज पोर्टल ‘पंढरपूर लाईव्ह’ साठी 

    महाराष्ट्राच्या कानाकोर्‍यातून विविध भागातील ताज्या  बातम्या पाठविणेसाठी  

    प्रतिनिधी नेमणे आहेत...  

    या क्षेत्रात काम करण्याची व जनसंपर्काची आवड असणार्‍या तरुण-तरुणींनी अवश्य संपर्क साधावा...

    -संपादक :- भगवान गणपतराव वानखेडे

    सा.झंझावात, पंढरपूर लाईव्ह

    मोबा. 8055434499, 8308838111, 8552823399

    कृपया इच्छूकांनी आपले अर्ज आणि पासपोर्ट साईज फोटो आपल्या संपुर्ण बायोडाटासह

    livepandharpur@gmail.com               jhanjavat@gmail.com

     या मेल आय डी वर ई-मेल करावेत.

    ताज्या घडामोडी साठी बघत रहा....

      www.pandharpurlive.com

     

Post a Comment

0 Comments