सांगोला/शंतनु शेळके - ‘पंढरपूर लाईव्ह’ मधील बातमीचा अंदाज ठरला अचूक ठरला असून सांगोला नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी सुहास उर्फ
चंदन होनराव यांची निवड झाली आहे.
सांगोला नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी 15 नोव्हेंबर हा अर्ज दाखल करण्याचा दिवस होता मात्र नगराध्यक्षपदासाठी शेकापचा हक्क असताना देखील शेकापक्षाकडून कॉंग्रेस पक्षाकडे नगराध्यक्षपद घेण्याची विचारणा झाली होती. त्यानुसार कॉंग्रेस पक्षाकडून याबाबतीत होकार देण्याचे ठरले आणि सुहास उर्फ चंदन होनराव यांचे नाव आघाडीवर आले.
.त्यानुसार कॉंग्रेसकडे असलेल्या नगरसेवकांपैकी सुहास उर्फ चंदन होनरावयांचीच निवड नगराध्यक्ष या पदावर झाली आहे. नगरपालिकेत शेकाप-कॉंग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षाच्या आघाडीची सत्ता असल्याने प्रत्येकी अडीच वर्षे शेकापला तर अडीच वर्षे कॉंग्रेसचा नगराध्यक्ष करण्याचा निर्णय झाला आहे. त्यात पुन्हा पहिल्या अडीच वर्षात प्रत्येकी सव्वा वर्षे नगराध्यक्षपद घेण्याचा निर्णय झाल्यामुळे पहिली सव्वा वर्षे शेकापचे मारुती बनकर यांनी नगराध्यक्षपद भूषविले. त्यानंतर कॉंग्रेसच्या प्रतिभा सपाटे यांना संधी देण्यात आली. दुसर्या सव्वा वर्षात कॉंग्रेस पक्षाने सपाटे यांच्याबरोबरच इमाम मणेरी यांनाही कांही महिने नगराध्यक्षपद देऊ केले. त्यांनतरच्या अडीच वर्षाच्या प्रारंभी शेकापने नवनाथ पवार यांना संधी दिली होती. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे नगराध्यक्षपद हे औटघटकेचे ठरले. पवार यांच्या राजीनाम्यानंतर नगराध्यक्षपदावर शेकापक्षाचाच हक्क असतानाही शेवटची सव्वा वर्षे स्वत:कडे ठेवून शेकापक्षाने सध्याच्या उर्वरीत वर्षभराच्या कालावधीसाठी कॉंग्रेसला या पदासाठी विचारणा केली होती त्यानुसार कॉंग्रेसने होकार देऊ केला होता.आणि काल अखेर नगराध्यक्षपदी सुहास उर्फ चंदन होनराव यांची निवड झाली.
................................................................................................................................................................
आपल्या जाहिराती पाठविण्यासाठी खालील ई-मेल आय डी वर संपर्क साधावा...
livepandharpur@gmail.com jhanjavat@gmail.com
मोबा. 8055434499, 8308838111, 8552823399
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
पंढरपूरचे
पहिले ई-न्यूज पोर्टल ‘पंढरपूर लाईव्ह’ साठी
महाराष्ट्राच्या
कानाकोर्यातून विविध भागातील ताज्या बातम्या पाठविणेसाठी
प्रतिनिधी नेमणे आहेत...
या क्षेत्रात काम करण्याची व जनसंपर्काची आवड असणार्या
तरुण-तरुणींनी अवश्य संपर्क साधावा...
-संपादक :- भगवान गणपतराव वानखेडे
सा.झंझावात, पंढरपूर लाईव्ह
मोबा. 8055434499, 8308838111, 8552823399
कृपया इच्छूकांनी आपले अर्ज आणि पासपोर्ट साईज फोटो आपल्या संपुर्ण बायोडाटासह
livepandharpur@gmail.com jhanjavat@gmail.com
या मेल आय डी वर ई-मेल करावेत.
या मेल आय डी वर ई-मेल करावेत.
ताज्या घडामोडी साठी बघत रहा....
www.pandharpurlive.com

0 Comments