पंढरपूर लाईव्ह वृत्त:-
चंद्रभागेच्या पैलतीरावरील गुरसाळे रोडवर भटूंबरे येथील अहिल्या चौकात आज दि. 11 नोव्हेंबर 2014 रोजी सायंकाळी 5:50 वाजण्याच्या सुमारास टेम्पो आणि मोटारसायकल मध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघेजण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

हा अपघात एवढा भीषण होता की, मोटारसायकलच्या पुढील चाक निखळले गेले होते. या भीषण अपघातामुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.
हे वृत्त प्रसिध्द करेपर्यंत या अपघाताची चौकशी एपीआय कुलकर्णी हे करत असल्याचे समजते मात्र या अपघाताबाबतचा पुढील तपास कुणाकडे आहे आदी माहिती समजलेली नव्हती.
याबाबत चे सविस्तर वृत्त असे की, पंढरपूर गुरसाळे रस्त्यावर अहिल्यादेवी चौक येथे सायंकाळी 5:50 वाजण्याच्या सुमारास आयशर टेम्पो (एम एच 45- 8545) आणि मोटारसायकल (एम एच 13 ए. एच. 4792) या दोघांची समोरासमोर धडक बसून घडलेल्या भीषण अपघातामध्ये मोटारसायकलवरील खर्डी (ता.पंढरपूर) गावचे संभाजी रोंगे (वय-42) व तानाजी चव्हाण (वय-28) हे जागीच ठार झाले.
0 Comments