पावसाने वनराई बंधारे भरले.....

ईश्वर वठार (ता.पंढरपूर) केले येथील लोकसहभागातून बांधण्यात आलेला वनराई बंधारा पावसाच्या पाण्याने पूर्ण भरलेला असून सोबत कृषी सहायक सौ.एस.आर.गवळी व शेतकरी.

              पंढरपूर लाईव्ह:-    शासनाच्या कृषी विभागा मार्फत लोकसहभागातून बांधण्यात आलेले वनराई बंधारे अवकाळी झालेल्या पावसाच्या पाण्याने भरल्यामुळे बंधा-याच्या परिसरातील शेतक-यांना याचा मोठा फायदा होत असल्याची माहिती कृषी सहायक सौ.एस.आर.गवळी यांनी दिली. महाराष्ट्र शासनाच्या वतिने राबवण्यात आलेल्या कृषी विभागातर्फे ग्रामीण भागात शेतक-यांच्या सहभागातून शेतक-यांच्या शेतामध्ये वनराई बंधारे बांधण्याचे काम चालू आहे.

                   यासाठी सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यामध्ये माती भरुण ही पिशवी खोलगट चारीमध्ये टाकूण पाणी अडवण्यासाठी वनराई बंधारे तयार करण्यात येत असून, अशा बंधा-यांमुळे पाणी अडवून शेतक-यांना या पाण्याचा मोठा फायदा होत आहे.
या शासनाच्या कृषी विभागाच्या धोरणास प्रतिसाद म्हणून ईश्वर वठार (पंढरपूर) येथे बांधण्यात आलेला वनराई बंधारा पावसाच्या पाण्याने तुडूंब भरला आहे. अशा प्रकारे विविध ठिकाणी कृषी विभागाच्या वतिने बंधारे बांधण्याचे काम चालू आहे.
                यासाठी तुंगतचे मंडल कृषी अधिकारी आर.एस.शेंडगे, कृषी सहायक सौ.एस.आर.गवळी, भारत पांढरे, पांडूरंग हळणवर, बाळ कुंभार, विकास घागरे, विठ्ठल घागरे, शैलजा सलगर, मारोती घोडके, दशरथ डूबल, बाळासो डूबल, बंडू धाराशिवकर व शेतक-यांनी प्रयत्न केले.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी...  विविध उद्योजक, व्यापारी व संस्था आता आपल्या जाहिराती पंढरपूर लाईव्हसाठी देवू शकतात... तसेच वाढदिवस वगैरे शुभेच्छा जाहिराती व विविध समारंभाच्या आमंत्रणाच्या जाहिराती सुध्दा आपण पंढरपूर लाईव्ह वर देवू शकता...

आपल्या जाहिराती पाठविण्यासाठी

खालील ई-मेल आय डी वर संपर्क साधावा...

livepandharpur@gmail.com                  jhanjavat@gmail.com

  मोबा. 8055434499,  8308838111,  8552823399 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

पंढरपूरचे  पहिले ई-न्यूज पोर्टल ‘पंढरपूर लाईव्ह’ साठी 

महाराष्ट्राच्या कानाकोर्‍यातून विविध भागातील ताज्या  बातम्या पाठविणेसाठी  

प्रतिनिधी नेमणे आहेत...  

या क्षेत्रात काम करण्याची व जनसंपर्काची आवड असणार्‍या तरुण-तरुणींनी अवश्य संपर्क साधावा...

-संपादक :- भगवान गणपतराव वानखेडे

सा.झंझावात, पंढरपूर लाईव्ह

मोबा. 8055434499, 8308838111, 8552823399

कृपया इच्छूकांनी आपले अर्ज आणि पासपोर्ट साईज फोटो आपल्या संपुर्ण बायोडाटासह

livepandharpur@gmail.com               jhanjavat@gmail.com

 या मेल आय डी वर ई-मेल करावेत.

ताज्या घडामोडी साठी बघत रहा....

  www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments