साथीच्या रोगाचा प्रसार टाळण्यासाठी शहीद कामटे संघटनेची जनजागृती

            पंढरपूर लाईव्ह:- सांगोला (जि.सोलापूर) शहर व तालुक्यात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्या वतीने सांगोला शहरात साथीचे रोगावर नियंत्रण आणण्यासाठी जनजागृती अभियान सुरु केल्याची माहिती संपर्क प्रमुख निलकंठ शिंदे (सर) यांनी पंढरपूर लाईव्ह ला दिली.

            या अभियानामध्ये प्रामुख्याने शहरात हिवताप, डेंग्यू, चिकनगुनीया यासारख्या साथीच्या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरातील नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात आले की, घरातील मोरी, नाले, स्वच्छ व साफ ठेवा, घरातील टाक्या व हौद वगैरे आठवड्यातून एकदा स्वच्छ करुन कोरडे करावे आणि नंतर पाणी भरावे. गळती असलेल्या टाक्या, हौद व नळ वेळीच दुरुस्त करून घ्यावेत.  त्यामुळे आजुबाजूच्या परिसरात पाणी साचून डासांची निर्मिती होणार नाही. छतावर असलेल्या पाण्याच्या टाक्या झाकून ठेवाव्यात. फुटलेले डबे, टायर आदी मध्ये व छतावर आणि परिसरात घाण पाणी साचू देवू नये. बागेत, घरासमोर अथवा घरातील हौदात गप्पी मासे सोडून द्यावेत. सदर मासे डासांची अंडी खातात. त्यामुळे डासोत्पत्ती थांबते. शक्यतो मच्छरदाणी लावून झोपावे. सर्व पाणीसाठे रिकामे करुन आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा.  आदी जनजागृती करण्यात आली.

             वातावरणातील विचित्र बदलामुळे रुग्णांचे प्रमाण वाढत आहे तरी शहर व परिसरातील प्रत्येक नागरिकांनी याबाबत जागरुक राहून काळजी घ्यावी असे आवाहन शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्या सर्व पदाधिकार्‍यांनी माहितीपत्रके वाटून केले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष आशिष जाधव व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी...  विविध उद्योजक, व्यापारी व संस्था आता आपल्या जाहिराती पंढरपूर लाईव्हसाठी देवू शकतात... तसेच वाढदिवस वगैरे शुभेच्छा जाहिराती व विविध समारंभाच्या आमंत्रणाच्या जाहिराती सुध्दा आपण पंढरपूर लाईव्ह वर देवू शकता...

आपल्या जाहिराती पाठविण्यासाठी

खालील ई-मेल आय डी वर संपर्क साधावा...

livepandharpur@gmail.com                  jhanjavat@gmail.com

  मोबा. 8055434499,  8308838111,  8552823399 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

पंढरपूरचे  पहिले ई-न्यूज पोर्टल ‘पंढरपूर लाईव्ह’ साठी 

महाराष्ट्राच्या कानाकोर्‍यातून विविध भागातील ताज्या  बातम्या पाठविणेसाठी  

प्रतिनिधी नेमणे आहेत...  

या क्षेत्रात काम करण्याची व जनसंपर्काची आवड असणार्‍या तरुण-तरुणींनी अवश्य संपर्क साधावा...

-संपादक :- भगवान गणपतराव वानखेडे

सा.झंझावात, पंढरपूर लाईव्ह

मोबा. 8055434499, 8308838111, 8552823399

कृपया इच्छूकांनी आपले अर्ज आणि पासपोर्ट साईज फोटो आपल्या संपुर्ण बायोडाटासह

livepandharpur@gmail.com               jhanjavat@gmail.com

 या मेल आय डी वर ई-मेल करावेत.

ताज्या घडामोडी साठी बघत रहा....

  www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments