राज्यमंत्री एकनाथ खडसे करणार कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची शासकीय महापूजा

https://pbs.twimg.com/profile_images/465875794489655296/6vf-XMEy_400x400.jpeg (पंढरपूर लाईव्ह):-

                 महाराष्ट्र राज्याचे मंत्री ना. एकनाथ खडसे हे सोलापूर जिल्हा दौ-यावर येत  असून त्यांच्या हस्ते यावर्षीची कार्तिकीनिमित्त शासकीय महापुजा संपन्न होणार आहे.

               त्यांच्या दौ-यातील कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे -
रविवार दि. 2 नोव्हेंबर 2014 रोजी सायंकाळी 4.30 वाजता हेलिकॉप्टरने पंढरपूर येथे आगमन.  सायंकाळी 4.45 वाजता शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे आगमन व राखीव. सायंकाळी 6 वाजता  श्री. झंडूजी महाराज मठ, पंढरपूर येथे सदिच्छा भेट. रात्री शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे मुक्काम. सोमवार दि. 3 नोव्हेंबर 2014 रोजी पहाटे 2.30 वाजता श्री. विठ्ठल - रुक्मिणीची कार्तिकी  एकादशी निमित्त शासकीय महापुजेस उपस्थिती. सकाळी 10 वाजता पंढरपूर येथून हेलिकॉप्टरने मुंबईकडे  प्रयाण.

Post a Comment

0 Comments