
पंढरपूर (पंढरपूर लाईव्ह):- कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने भुवैकूंठ पंढरी नगरी टाळ-मृदंगाच्या निनादात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमली आहे. जगाच्या कानाकोपर्यातून लाखो वैष्णव भक्तांचा मेळा पंढरीत जमा झालेला असून प्रशासनाच्या वतीने भाविकांच्या सोयीसुविधांसाठी योग्य त्या यंत्रणा सज्ज ठेवलेल्या आहेत. चंद्रभागा वाळवंट, मंदिर परिसर भाविकांनी गजबजून गेला आहे. पदर्शन रांग संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडपाचे सात गाळे भरून पुढे गेली आहे. दरम्यान, यात्रेसाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडलेले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी संजय तेली यांनी दिली.
आषाढीनंतर सर्वाधिक भाविक हे कार्तिकी यात्रेसाठी पंढरीत येतात असतात. भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी नगरपालिकेकडून प्रर्यंकरण्यात येत आहेत. पाणी, वीज तसेच स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मंदिराकडे जाणार्या
दर्शन रांग, मंदिर परिसरात 94 सीसीटीव्ही कॅमेरे : यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. दर्शन रांग तसेच मंदिराच्या ठिकाणी एकूण 94 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पददर्शन रांगेत होणारी घुसखोरी तसेच मंदिर परिसरात घडणार्या घडामोडींवर यामुळे बारीक लक्ष ठेवता येणार असून, मंदिर कार्यालयातून याचे नियंत्रण केले जाणार आहे.मार्गांवर ठिकठिकाणी बॅरेकेटींग करण्यात आले असून, स्टेशन रोड, मंदिर परिसर याठिकाणीची अतिक्रमणे नगरपालिकेकडून गुरूवारी हटविण्यात आली. उच्चकार्तिकी यात्रेच्या निमित्ताने पंढरीत भविकांची गर्दी वाढली आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर नगरपालिकेकडून स्वच्छतेकडे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. नगरपालिका मुख्याधिकारी शंकर गोरे हे इतर आधिकार्यांसह सर्व ठिकाणची पाहणी करून भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेत आहेत.

0 Comments