नगर पंढरपूर लाईव्ह
‘‘एवढी वर्षे आंदोलने करूनही खर्या अर्थाने लोकांना फायदा मिळत नसेल तर आता बस्स... झाले एवढे काम पुरे झाले’’ अशा शब्दात आपल्या मनातील व्यथा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या बरखास्त केलेल्या समित्यांची सध्या तरी पुन्हा स्थापना करण्यात येणार नाही, असे स्पष्ट करतानाच केवळ पदांसाठी काम करू नका, अशा कार्यकर्त्यांनी माझे नावही वापरू नये,’ असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांसाठी आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या शिबिराचा समारोप राळेगणसिद्धी येथे झाला. त्यावेळी हजारे बोलत बोलत होते. या शिबिरात बोलताना अनेक कार्यकर्त्यांनी बरखास्त केलेल्या समित्या पुन्हा स्थापन करून तालुकानिहाय पदाधिकारी नियुक्त करण्याची सूचना मांडली. हजारे यांनी फेटाळली. ते म्हणाले, ’माझे नाव वापरणार्यांचा आता तिटकारा आला आहे. समित्या बरखास्त केल्या तरी माजी पदाधिकारी म्हणून अनेक जण मिरवत आहेत. माझे वय आता 75 वर्षे आहे. आतपर्यंत 37 वेळा विविध कारणांसाठी राज्याचा दौरा केला. संघटन आणि कायद्याचा प्रचारासाठी फिरलो. पण त्याचा फारसा उपयोग होत नाही, असे दिसते. कायदा करण्यासाठी आंदोलन, कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून आंदोलन, त्याचा प्रचार करण्यासाठी आंदोलन, त्याला विरोध करणार्यांच्या विरोधात आंदोलन, अशी आंदोलने तरी कशाकशासाठी करायची, असा प्रश्न आज उभा राहतो आहे. त्यामुळे एकवेळ असे वाटते की, आपल्या आतापर्यंतच्या आयुष्यात आपण जनतेसाठी जे केले, ते पुरे झाले.’
कार्यकर्त्यांना ते म्हणाले, ’पुढील तीन महिने कोणतेही पद न घेता काम करा. माहितीचा आधिकार, ग्रामसभेला अधिकार, दप्तर दिरंगाई विरोधी कायदा व दारुबंदी कायदा यांचा प्रसार करा, तीन महिन्यानंतर स्वतःच्या आपल्या कामाचे मूल्यमापन करा, त्यानंतर आपण समित्यांचा निर्णय घेऊ.’ 34 जिल्ह्यांतील आलेले कायकर्ते या शिबिरात सहभागी झाले होते.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पंढरपूरचे पहिले ई-न्यूज पोर्टल ‘पंढरपूर लाईव्ह’ साठी महाराष्ट्राच्या कानाकोर्यातून विविध भागातील ताज्या बातम्या पाठविणेसाठी
प्रतिनिधी नेमणे आहेत...
या क्षेत्रात काम करण्याची व जनसंपर्काची आवड असणार्या तरुण-तरुणींनी अवश्य संपर्क साधावा...
आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी विविध उद्योजक, व्यापारी व संस्था आता आपल्या जाहिराती पंढरपूर लाईव्हसाठी देवू शकतात...
-
तसेच वाढदिवस वगैरे शुभेच्छा जाहिराती व विविध समारंभाच्या आमंत्रणाच्या जाहिराती सुध्दा आपण पंढरपूर लाईव्ह वर देवू शकता...
आपल्या जाहिराती पाठविण्यासाठी
संपर्क साधावा...


0 Comments