बेवारस मयता बाबत आवाहन

                            बेवारस मयता बाबत आवाहन

 

पंढरपूर-दि.07- पंढरपूर येथील सरगम टॉकीज जवळ रेल्वे इंजिन खाली सापडून एक अनोळखी  व्यक्ती  जबर जखमी होवून घटनास्थळी  जागीच  मयत झाली असल्याची माहिती पंढरपूर रेल्वे पोलिसांनी एका पत्रकान्वये कळविली आहे.

      या अनोळखी  मयत व्यक्तीचे  वय अंदाजे 32 वर्षे, बांधा मजबुत, उंची 5 फुट 1 इंच, वर्ण निमगोरा, नाक बसके, अंगामध्ये पांढ-या रंगाचा  हाप टी शर्ट व त्यावर गुलाबी रंगाची पट्टी आजोबा गणपती सांगोला असे लिहिलेले तसेच काळ्या रंगाची पॅन्ट, उजव्या हातात TB गोंदलेले असे मयत व्यक्तीचे वर्णन असून संबधीत नातेवाईकाने तसेच ओळखीच्या व्यक्तींनी पंढरपूर लोहमार्ग पोलिस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



                                            0000

Post a Comment

0 Comments