संचालक (प्रशासन) प्रल्हाद जाधव हे काल नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सचिव श्रीमती मनीषा म्हैसकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करुन भावपूर्ण निरोप देण्यात आला. श्री. जाधव यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदी श्री. आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री.आंबेकर यापूर्वी राजशिष्टाचार विभागात उपसचिव पदावर कार्यरत होते. आज त्यांनी नवीन प्रशासकीय इमारतीतील 17 व्या मजल्यावरील दालनात कार्यभार स्वीकारला. श्री.आंबेकर यांच्याकडे महासंचालक पदाचाही अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

0 Comments