पंढरपूर लाईव्ह साठी-
सांगोला (शंतनू शेळके)
सांगोला (शंतनू शेळके)
सावे-
सावे-बामणी गावच्या
पुलालगतच्या स्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे सर्वत्र रस्त्यांची झाली
चाळण झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहतुकीला अडथळे
निर्माण होऊन या ठिकाणी अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे आता
सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराकडून तत्काळ रस्ता दुरुस्त
करून द्यावा, अशी मागणी सावे-बामणी ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे.
रस्ते
दुरूस्तीची वारंवार मागणी करण्यात येत असली तरी याकडे गांभिर्याने लक्ष
दिले जात नाही. रस्ते नादुरूस्त असल्याने अनेकदा अपघात होतात. कित्येकदा
अपघातांमुळे जीवही गमवावा लागतो. अशी परिस्थिती असतानाही रस्ते दुरूस्ती
होत नसल्याने, नागरिकातून आता संताप व्यक्त होत आहे.ग्रामीण भागातून
ग्रामस्थांना दररोज तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. शाळकरी मुलांनाही
शाळेमध्ये यावे लागते. रात्री- अपरात्री ग्रामीण भागातून प्रसुतीसाठी
महिलांना किंवा रूग्णांना शहरात आणले जाते. अशा वेळी त्यांचे हाल अधिकच
होतात, यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील रस्ते डांबरीकरण करण्यासह खड्डे
बुजविण्याची मागणी होत आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पंढरपूरचे पहिले ई-न्यूज पोर्टल ‘पंढरपूर लाईव्ह’ साठी महाराष्ट्राच्या कानाकोर्यातून विविध भागातील ताज्या बातम्या पाठविणेसाठी प्रतिनिधी नेमणे आहेत... या क्षेत्रात काम करण्याची व जनसंपर्काची आवड असणार्या तरुण-तरुणींनी अवश्य संपर्क साधावा...
-संपादक
भगवान गणपतराव वानखेडे
सा.झंझावात,
पंढरपूर लाईव्ह
मोबा. 8055434499
8308838111
8552823399
कृपया इच्छूकांनी आपले अर्ज आणि पासपोर्ट साईज फोटो आपल्या संपुर्ण बायोडाटासह
livepandharpur@gmail.com
jhanjavat@gmail.com
या मेल आय डी वर ई-मेल करावेत.
ताज्या घडामोडी साठी बघत रहा....
www.pandharpurlive.com
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

0 Comments