* रस्तेदुरुस्तीचा साबावीकडून भावेप्रयोग
* अपघातांच्या संख्येत झाली वाढ
* साबावि च्या दुर्लक्षाने अनेक जीवांचा बळी
* डांबरीकरणाचा पैसा कुठे मुरला?
खड्यात गेले सांगोला - भाग -१
पंढरपूर लाईव्ह साठी-शंतनु शेळके ८८८८७७१३८५
सांगोला शहरातील रस्त्यांची अक्षरश चाळण झाली असून, रस्त्यात खड्डे पडले आहेत की खड्ड्यांत रस्ते, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. खड्ड्यांमधून होणा-या रोजच्या उंटसवारीमुळे वाहन चालकांत पाठदुखीची समस्या बळावल्याची प्रकरण समोर आली आहेत. दरवर्षी कोटय़वधी रुपये रस्ते दुरुस्ती आणि निगा तसेच नवीन बांधणीसाठी खर्च केले जाता मग असा सवाल नागरिकांना विचारण्याची वेळ का येते?
सांगोला शहरातील वाढेगाव नाका,भीमनगर,कोष्टी गल्ली, नेहरू चौक,महूद
रोड,साठे नगर,अशा अनेक ठिकाणची पाहणी जर आपण केली तर आपणाला सर्वत्र
रस्त्यांची चाळण झाल्याचे दिसून येईल.पाऊस नसताना अशी परिस्थिती आहे मग
पावसात काय असेल याची कल्पनाही कोणी करू शकणार नाही. रस्ते दुरुस्त
करण्याच्या प्रयोगात साबावी दरवर्षी कोटय़वधी रुपये खर्च करते, तरीही शहरात
रस्त्यांवर खड्डे मात्र कायम आहेत. कंत्राटदार व साबावी अधिकारी यांच्या
अभद्र युतीने शहरातील रस्त्यांच्या दुर्दैवाचे दशावतार काही संपत
नाहीत.शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने करदात्यांच्या
कोटय़वधी रुपयांतून करण्यात आलेल्या डांबरीकरणाचा पैसा कुठे मुरला, असा
प्रश्न आता केला जात आहे. शहराचा कायापलट करण्याची स्वप्ने दाखवणा-या
अभियंत्यांचे मौन यात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे द्योतकच मानले
जात आहे. रस्त्याच्या कामाचा दर्जा अत्यंत खराब असल्याने सध्या रस्त्यावर
अगणित खड्डे पडले आहेत. या खड्डयांची जबाबदारी साबावी सोलापूर विभागाचे
अधिकारी जबाबदारी घेऊन कंत्राटदाराला काळया यादीत टाकणार का? असा प्रश्न
विचारला जात आहे.गोजागी खड्डयांनी डोके वर काढल्याने वाहनचालक हैराण झाले
आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधी तसेच साबावी दुर्लक्ष करत
असल्याने वाहनचालकांना खड्डयांतून वाहने आदळत-आपटत प्रवास करावा लागत आहे.
परिणामी वाहनांचे पार्ट ढिले पडून वाहन दुरुस्तीचा आर्थिक भुर्दंडही सोसावा
लागतो. सार्वजनिक बांधकाम विभागाने नव्याने कोटय़वधी रुपये खर्चून
डांबरीकरण केलेल्या रस्त्यांची चारच महिन्यांतच वाट लागली आहे. वाढेगाव
नाका,भीमनगर,कोष्टी गल्ली, नेहरू चौक,महूद रोड,साठे नगर, आदी ठिकाणी
जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांमुळे वाहनचालकांची दैना
मात्र संपलेली नाही.
एकीकडे सरकार रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता चांगली
ठेवण्यासाठी बांधकाम विभागाच्या अधिका-यांवर जबाबदारी सोपवत असतानाच, हे
रस्ते थोड्या महिन्यांतच कसे उखडले, याचा जाब तालुक्यातील नागरिक विचारत
आहेत.अशा या सांगोल्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी यांची
विभागीय चौकशी करावी अशी मागणी जनतेमधून जोर धरू लागली आहे जोर धरू लागली
आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
अशा अधिकार्यांची ताबडतोब बदली करावी
सांगोला-पंढरपूर रोडवर बिलेवाडीजवळ अनेक वळण आहेत मात्र एकही वळणात दिशादर्शक फलक नसल्याने अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागतेय यामध्येच माझा भाऊ गेला माझ्या भावाचा याच वळणात दिशादर्शक फलक नसल्याने अपघात झाला होता या साबाविच्या अधिकार्यांना बळी गेलेल्या कुटुंबाची जर भावना काळात नसेल तर अशा अधिकाऱ्यांची ताबडतोब बदली करावी-नितीन पगारे.
--------------------------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पंढरपूरचे पहिले ई-न्यूज पोर्टल ‘पंढरपूर लाईव्ह’ साठी महाराष्ट्राच्या कानाकोर्यातून विविध भागातील ताज्या बातम्या पाठविणेसाठी प्रतिनिधी नेमणे आहेत... या क्षेत्रात काम करण्याची व जनसंपर्काची आवड असणार्या तरुण-तरुणींनी अवश्य संपर्क साधावा...
-संपादक
भगवान गणपतराव वानखेडे
सा.झंझावात,
पंढरपूर लाईव्ह
मोबा. 8055434499
8308838111
8552823399
कृपया इच्छूकांनी आपले अर्ज आणि पासपोर्ट साईज फोटो आपल्या संपुर्ण बायोडाटासह
livepandharpur@gmail.com
jhanjavat@gmail.com
या मेल आय डी वर ई-मेल करावेत.
ताज्या घडामोडी साठी बघत रहा....
www.pandharpurlive.com
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

0 Comments