पंढरपूर लाईव्ह (राजकुमार शहापूरकर) 30 december 2014
अशासकीय संस्था. स्वयंसेवी संस्था म्हणून ओळखल्या जाणार्या सेवाभावी संस्थांच्या कामाची भारतात खरे तर स्वातंत्र्याआधीपासूनच सुरुवात झाली होती. मात्र त्यात सेवाभाव महत्त्वाचा होता. आता सेवा मधील’ से’ची जागा मे’ ने घेतल्यामुळे पूर्वी सामाजिक कार्यकर्त्यांच्या खांद्यावरची झोळी’ गायब होऊन त्याची जागा आता डी. डी.चेक यांनी घेतली असल्याचे दिसुन येत आहे.
चांगला हेतुने व प्रामाणिकपणे समाजकार्य करणार्या अनेक संस्था आहेत, या संस्थांच्या प्रामाणीक पदाधिकार्यांनी मागासलेल्या दलित, आदिवासी वर्गात ज्ञानाचा प्रकाश पोहोचवला. दुर्गम दर्याखोर्यात राहणार्या उपेक्षितांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी त्यांनी अनेक संकटांचा सामना करीत काम केले. त्यामुळे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी आरोग्य सेवा उपलब्ध झाल्या. मात्र पुढे हाय प्रोफाईल एनजीओंनी या क्षेत्रात विशिष्ट हेतू घेवून प्रवेश करण्यास सुरुवात केली. काही चांगल्या लोकांमुळे कुष्ठरोगी, अंध-अपंग, परित्यक्ता, विधवा, वयोवृद्ध अशा विविध स्तरांतील नकोशा’ लोकांना माणुसकीचा स्पर्श लाभला; परंतु अशा चांगल्या कामात रंगलेल्या लोकाना देश-विदेशातून चांगले आर्थिक पाठबळ मिळतेच असे नाही, पण प्रत्यक्ष कामापेक्षा पेपर रंगवण्याच्या’ कलेत हुशार असणार्या स्वयंसेवी संस्थांनी या क्षेत्रात मोठी कमाई करता येते हे ओळखून यात ऊडी घेतली.
एका माहितीनुसार देशात 68 हजार स्वयंसेवी संस्थांना 2008 ते 2011 या तीन वर्षाच्या कालावधीत परदेशातून 31 हजार 900 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. हा पैसा कुठून येतो? कुठे जातो? याचा तपशील गृहमंत्रालयाने दिला नाही, परंतु हा पैसा भारतात आणताना शासकीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करणा-या 4138 संस्थांची नोंदणीच रद्द केली गेली असल्याची आणि 24 घोटाळेबाज एनजीओजची सीबीआयमार्ङ्गत चौकशी सुरू असल्याचे गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
आपल्या आजुबाजुस नजर टाकली असता अनेक ठिकाणी केवळ कागदोपत्री बहुद्देशीय सेवाभावी संस्थांचे अस्तित्व दिसुन येत असुन अनेक संस्थांनी तर स्थापनेपासुन एकदाही आपले ऑडिट पुर्ण करुन घेतले नसल्याचे निदर्शनास आले आहे.या संस्थांवर नियंत्रण ठेवणारी धर्मादाय आयुक्त कार्यालयातील यंत्रणाही केवळ कागदोपत्री सोपस्कार पार पाडण्याशिवाय फारसे काही करीत नसुन त्यामुळे अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीही सेवाभावी संस्थांच्या नावे आपले राजकीय बस्तान बसविण्याचा प्रयत्न करीत आहेत.तर अनेक संस्था केवळ कागदोपत्री सेवा करीत असल्याचे दर्शवुन आपले ईप्सीत साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा संस्थांचा लेखा या लेखमालेतून आम्ही मांडणार आहोत.
(क्रमश:)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
************************************
*************************************
‘पंढरपूर लाईव्ह’च्या सर्व वाचकांना कळविण्यास आनंद होतो की, आत्ता आम्ही दररोज ‘टू डेज अपडेट’ मध्ये आपल्यासाठी एक ‘हट के’ मात्र सामाजिक हितासाठी महत्वाची न्यूज घेवून येत आहोत...
*************************************‘पत्रकार -राजकुमार शहापूरकर’ हे यामधील सर्व अभ्यासपुर्ण लिखाण दररोज करणार असून यातील न्यूज अथवा लेखा संदर्भात आपण त्यांच्याशी थेट संपर्क साधु शकता...
त्यांचा संपर्क क्रमांक आहे.. 777 39 78 140
बघत रहा "पंढरपूर लाईव्ह"
"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या दि. 30 डिसेंबर 2014 अखेर 36746 एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत दि. 30 डिसेंबर 2014 अखेर तब्बल 1798 अँन्ड्राँईल मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ... या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा
ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती
http://market.android.com/ search?q=pname%3Acom.wPandh arpurLive
आपला :-- भगवान वानखेडे (संपादक)
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com


0 Comments