पंढरपूर लाईव्ह
सोलापूर दि. 30 : पंढरपूर विकास प्राधिकरणामार्फत कामे करताना वारक-यांना सोयी - सुविधा देण्याबरोबरच आर्थिक विकास केंद्र झाले पाहिजे या दृष्टीने विचार करावा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पंढरपूर विकास प्राधिकरणाच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक, पंढरपूरचे प्रांताधिकारी संजय तेली, पंढरपूर न.प.चे मुख्याधिकारी शंकर गोरे, नगर रचनाचे सहायक संचालक एस.पी. पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी मुंढे म्हणाले की, या प्राधिकरणामार्फत कामे करताना भविष्यातील 5 ते 100 वर्षापर्यंतचा विचार करुन विकास कसा होईल याबाबचे नियोजन करावे. यामध्ये या परिसरात पर्यटन उद्योग, कृषी आधारित उद्योग, शैक्षणिक विकास, कुशल मनुष्यबळाची उपलब्धता, वारीसाठी व कायमस्वरुपी आपत्ती व्यवस्थापन, पंढरपूर - तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर या धार्मिक स्थळांच्या मार्गावरचा रस्ता विकासाचा आराखडा याकडे विशेष लक्ष देण्याचा सूचना बैठकीत दिल्या. या परिसरातील रिंग रोड व अंतर्गत रस्ते, याबाबतचा वाहतुकीचा आराखडा बनवावा. उदा. बस सुविधेसाठी थांबा कुठे असेल वैगेरेचा विचार करावा. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने ठराविक ठिकाणी पोलीस चौकीसाठी जागा निश्चिती करावी. भविष्यात आवश्यकता भासल्यास पोलीस स्टेशनसाठी जागा, प्रशासकीय इमारत, वारक-यांसाठी सुविधा केंद्र आदिबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत घनकचरा व्यवस्थापन, वॉटर ट्रीटमेंट प्लॅन, स्वच्छता आदिबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच पंढरपूर विकास प्राधिकरणामार्फत परिसरातील 41 गावासाठी विकास आराखडा बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. याबाबतच्या विविध आराखड्याद्वारे सविस्तर माहिती जिल्हाधिकारी यांनी घेतली.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
************************************
बघत रहा "पंढरपूर लाईव्ह"
"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या दि. 30 डिसेंबर 2014 अखेर 36771 एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत दि. 30 डिसेंबर 2014 अखेर तब्बल 1798 अँन्ड्राँईल मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ... या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा
ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती
http://market.android.com/ search?q=pname%3Acom.wPandh arpurLive
आपला :-- भगवान वानखेडे (संपादक)
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com



0 Comments