
पंढरपूर लाईव्ह
1 हजाराच्या नोटा निघालेल्या पाहिल्या.... नाणे पाहिले... सर्वांचेच स्वागत भारतीयांनी मोठ्या आनंदाने केले असेल... मात्र आजही जुन्या आणि कालबाह्य ठरलेल्या 1 रुपयाच्या करकरीत नोटाची जादू कायम आहे... कांहीजण आपल्या खिशाच्या पाकीटातील दर्शनी भागात शुभ-सुचक किंवा शोभा वाढावी म्हणून 1 रुपयाची नोट हौस म्हणून लावत असत मात्र या नोटा कालबाह्य झाल्या... आत्ता नव्या रंगातील नव्या रुपातील 1 रुपयाची नोट झळकणार आहे...चलनातून गायब झालेल्या एक रुपयांच्या नोटा अवघ्या दोन महिन्यांत शहरातील बाजारपेठेत दिसतील. १ जानेवारीपासून या नोटांची छपाई केंद्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आली.
१, २ आणि ५ रुपयांची नाणी चलनात आल्यानंतर सुमारे २० वर्षांपूर्वी या रुपयांच्या नोटांवर बंदी आणली. एक रुपयांच्या नोटांची छपाई नोव्हेंबर १९९४ मध्ये, दोन रुपयांच्या नोटा फेब्रुवारी १९९५ मध्ये, तर पाच रुपयांच्या नोटांची छपाई नोव्हेंबर १९९५ मध्ये बंद करण्यात आली. दरम्यान, ५ रुपयांच्या नोटांची छपाई सरकारने पुन्हा सुरू ठेवली होती. आता केंद्र सरकारने पुन्हा एक रुपयांच्या नोटांची छपाई करण्याचा निर्णय घेतला असून, अर्थ मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध केली आहे.
रंग, रूप बदलणार
आता एक रुपयाच्या नोटेवर विद्यमान अर्थ सचिव राजीव महर्षी यांची स्वाक्षरी असणार आहे. नोटेच्या दर्शनी भागात 'भारत सरकार' व एक रुपयाच्या नाण्याचे चित्र छापलेले असेल. या नोटांचा रंगही नेहमीच्या नोटांपेक्षा वेगळा असेल.
औरंगाबादमध्ये एक रुपयांची नोट यायला निदान २
महिने तरी लागतील. औरंगाबादमध्ये या नोटा आरबीआयकडून एसबीआय, महाराष्ट्र
बँक आणि एसबीएचच्या मुख्य कार्यालयाच्या मागणीनुसार याच बँकांना दिल्या
जातील. छपाईनंतर आधी मुंबई-पुण्यात आल्यानंतर त्या व्यवहारात येण्यास
सुरुवात होईल.
- देविदास तुळजापूरकर, महाराष्ट्र बँक.
___________________________
बघत रहा "पंढरपूर लाईव्ह"
"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 3 जानेवारी 2015 रोजी 37, 651 एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत
3 जानेवारी 2015 रोजी तब्बल 1915 अँन्ड्राँईड मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ... या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा
ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती
http://market.android.com/ search?q=pname%3Acom.wPandh arpurLive
आपला :-- भगवान वानखेडे (संपादक)
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com



0 Comments