पंढरपूर लाईव्ह
(दि. 3 जानेवारी 2014) करमाळा तालुक्यात असलेलल्या एका गावात मध्यान्ह भोजनातून 350 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विद्यार्थ्यांना प्रथम स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. ज्या 20 ते 20 मुलांची प्रकृती खालावली त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात कोर्टी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये सुमारे 350 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे वृत्त आहे. या विद्यार्थ्यांपैकी 20 ते 22 मुलांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या सगळ्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती मिळते आहे.
श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये आज सकाळी साडे नऊच्या सुमारास विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजन योजने अंतर्गत पुरण्यात येणारी खिचडी देण्यात आली. त्यानंतर अनेकांना मळमळ, तसेच अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर एकापाठोपाठ एक असे सगळेच विद्यार्थी पोट दु:खी आणि मळमळ झाल्याची तक्रार करू लागले. या विद्यार्थ्यांना प्रथम स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. ज्या 20 ते 20 मुलांची प्रकृती खालावली त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील उपचारानंतर मुलांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या सर्व प्रकाराची चौकशी सुरू असून अन्न पदार्थांचे नमूने प्रशासनाकडून गोळा करण्यात आले आहेत. तपाणी अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे कळते.
................................................................................
बघत रहा "पंढरपूर लाईव्ह"
"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 3 जानेवारी 2015 रोजी 37, 651 एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत
3 जानेवारी 2015 रोजी तब्बल 1915 अँन्ड्राँईड मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ... या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा
ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती
http://market.android.com/ search?q=pname%3Acom.wPandh arpurLive
आपला :-- भगवान वानखेडे (संपादक)
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com




0 Comments