... आणि भारतावर होणारा ‘1/1’ चा दहशतवादी हल्ला टळला...!

पंढरपूर लाईव्ह

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 (दि. 2 जानेवारी 2014)

पाकिस्तानी दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे येऊन मुंबईवर केलेल्या '२६/११'च्या भीषण हल्ल्याला नुकतीच सहा वर्षे पूर्ण झाली असतानाच, त्याचीच पुनरावृत्ती घडवण्याचा प्रयत्न भारतीय तटरक्षक दलाने थरारक कामगिरी करून हाणून पाडला आहे. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षाचा जल्लोष सुरू असतानाच, गुजरातजवळ अरबी समुद्रात स्फोटकांनी भरलेल्या पाकिस्तानी म‌च्छिमार नौकेचा छडा तटरक्षक दलाला लागला. तटरक्षक दलाने तिचा पाठलाग सुरू करताच नौकेतील चौघांनी ती उडवूनच दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून, भारतावरील '१/१' चा दहशतवादी हल्ला टळल्याचे बोलले जात आहे.


पाकिस्तानच्या कराचीजवळील केती बंदरातून ही नौका निघाली होती व अरबी समुद्रात ती काही बेकायदा कारवाया करणार असल्याचा सुगावा भारतीय तटरक्षक दलाला लागला होता. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर तटरक्षक दलाच्या डॉर्निअर विमानाने या नौकेला पोरबंदरच्या नैऋत्येस ३६५ किमी अंतरावर टिपले. त्यानंतर तटरक्षक दलाच्या जहाजांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला असता, नौकेने वेग वाढवून भारतीय सागरी हद्दीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला. तटरक्षक दलाच्या जहाजांनी तासभर या नौकेचा पाठलाग केला. गोळीबाराद्वारे इशारा देऊन त्या नौकेस अडवण्यात आले असता, नौकेवर चार जण असल्याचे दिसले. त्यांनी तपासासाठी थांबण्याची तटरक्षक दलाची सूचना धुडकावून लावत नौकाच पेटवून दिली. त्यामुळे स्फोट होऊन नौकेची शकले उडाली. अंधार, खराब हवामान, वेगवान वारे यांमुळे तटरक्ष
दलाला त्या नौकेला वाचवता आले नाही व चौघा संशयितांसह ती पाण्यात बुडाली. तटरक्षक दलाचे महानिरीक्षक (ऑपरेशन्स) के. आर. नौटियाल यांनी ही माहिती दिली.

समुद्रमार्गे हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाल्याने गेले दोन महिने तटरक्षक दल आणि अन्य सुरक्षा दले कडक गस्त घालत असताना ही घटना महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, ही नौका दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत होती किंवा कसे त्याविषयी संरक्षण मंत्रालयाकडून अधिकृतपणे काहीही जाहीर करण्यात आलेले नाही.

आणखी दोन संशयित बोटी?

या घटनेनंतर दोन दिवसांतच, शुक्रवारी संध्याकाळी उशिरा पोरबंदरजवळ अरबी समुद्रात आणखी दोन संशयित बोटी आढळल्याचे वृत्त काही वेबसाइटनी दिले. गुप्तवार्ता यंत्रणांनी दोन बोटींदरम्यानचे संशयास्पद रेडिओ संभाषण टिपल्यानंतर तटरक्षक दलाने आपल्या नौका या संशयित नोकांच्या मागावर पाठवल्याचे कळते. 

................................................................................

बघत रहा "पंढरपूर लाईव्ह"


"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 2 जानेवारी 2015 रोजी  37, 327  एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत

2 जानेवारी 2015 रोजी तब्बल 1874 अँन्ड्राँई मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ...  या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.


पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....

पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा


ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती

http://market.android.com/search?q=pname%3Acom.wPandharpurLive

 


आपला :-- भगवान वानखेडे (संपादक)

मोबा. नं.  8055434499  /  8308838111
 

  आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com


Post a Comment

0 Comments