श्रीविठ्ठल एज्यूकेशन अ‍ॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये ‘बीटस्-2015’ चे आयोजन


पंढरपूर लाईव्ह दि. 08/01/2015

    गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट मध्ये आज अर्थात शनिवार दि. 09 जानेवारी व रविवार दि.10 जानेवारी रोजी सांय 5 वा.‘बीटस् 2015’ या सांकृतीक कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.

     दरवर्षी प्रमाणे यंदाही अभियांत्रिकी महाविदयालय (पदविका,पदवी व पदव्युत्तर पदवी)व औषधनिर्माणशास्त्र महाविदयालय (पदविका,पदवी व पदव्युत्तर पदवी) यांच्या संयुक्त विदयमाने आयोजिलेल्या अभियांत्रिकीच्या मध्यवर्ती असलेल्या खुल्या रंगमंचावर या बीटस् 2015 चे उदघाटन माजी विद्यार्थी चिदंबरम नाचिप्पान इंडिया बिझनेस मॅनेजर, युबिकेटी नेटवर्क, अमेरिका यांच्या श्ाुभ हस्ते होणार आहे. दोन दिवस चालणार्‍या या बीटस 2015 कार्यक्रमात पारंपारिक वेशभ्ाूषा, फनी गेम्स्, शेला पागोटे असे विविध कार्यक्रम होणार आहेत. बीटस्च्या निमित्ताने सर्व समित्या कार्यरत असल्याची माहिती सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे यांनी दिली. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल, उपाध्यक्ष एन.एस.कागदे,ज्येष्ठ विश्‍वस्त दादासाहेब रोंगे, तसेच डॉ.रोंगे यांचे श्री विठ्ठल इन्स्टिटयूटच्या व्यवस्थापनातील इतर सर्व सहकारी,संस्थेअतर्गत असणार्‍या इतर कॉलेजचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थितीत राहणार आहेत.
छायाचित्र:-
1.कार्यक्रम पत्रिका,
2.संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे

-++++++++++++++++++++++++++++++++++++

बघत रहा "पंढरपूर लाईव्ह"



"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 8 जानेवारी 2015 रोजी  39,438  एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत



   8 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2135 अँन्ड्राँई मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ...  या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.


पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....


पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा


ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती

http://market.android.com/search?q=pname%3Acom.wPandharpurLive

  

आपला :-- 

भगवान वानखेडे (संपादक) 

मोबा. नं.  8055434499  /  8308838111
   आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments