पत्रकार मित्र सत्कार समितीच्या वतीने पंढरीत पत्रकार दिन धुमधडाक्यात साजरा...
पंढरपूरच्या पत्रकारितेच्या इतिहासात नोंद व्हावी असा सुंदर देखणा कार्यक्रम...
पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल उंबरे व अभिराज उबाळे यांचे कौतुक....
पंढरपूर लाईव्ह

पंढरपूर दि. 7- सोलापूर जिल्ह्याच्या पत्रकारितेचा इतिहास व वर्तमान उज्वल असून येथील विकासासाठीमाध्यमांचे योगदान मोठे असल्याचे मत माजी उपमुख्यमंत्री तथा खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनीमांडले. पंढरपूर येथे नागरिकांच्या वतीने पत्रकार मित्र सत्कार समितीची स्थापना करण्यात आली होती व पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मोहिते पाटील बोलत होते.
अध्यक्षस्थानी आमदार भारत भालके होते. व्यासपीठावर आमदार दीपक साळुंखे, रमेश कदम, नगराध्यक्षा
साधना भोसले, ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्रा.डॉ. द.ता.भोसले ,सहकार शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, दलित स्वयंसेवक संघाचे दिलीप देवकुळे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट उपस्थित
होते.
यावेळी बोलताना आमदार रमेश कदम म्हणाले, माध्यमांची ताकद ही नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स मिडीया आणि वृत्तपत्र या दोघांची घौडदौड या काळात सुरू आहे.
आमदार दीपक साळुंखे म्हणाले, पंढरपूरच्या पत्रकार भवनासाठी आपण दहा लाख रूपये आमदार निधी
देण्यास तयार आहोत. पत्रकार दिनाच्या या दिवशी स्व. रंगाआण्णा वैद्य यांची आठवण होते. जिल्ह्याच्या
पत्रकारितेचा इतिहास हा दैदिप्यमान आहे. प्रा. डॉ. द.ता.भोसले यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनाची
माहिती दिली. नगराध्यक्षा साधना भोसले यांनी पत्रकार भवन उभारणीसाठी पत्रकार संघाला सहकार्य करण्याचे
आश्वासन दिले.
यावेळी पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे व इतर उपस्थित सर्व पत्रकारांचा पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, पेन व डायरी देवून यथोचित सत्कार करण्यात आला., पत्रकारांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पत्रकार संघाच्या वतीने काढण्यात आलेल्या अपघाती विमा पॉलिसीजचे वितरण यावेळी झाले. यावेळी सत्कार समितीचे जयसिंग पाटील, दिलीप कोरके, हिंमत आसबे, पत्रकार संघाचे अध्यक्ष अभिराज उबाळे, श्रमिक संघाचे अध्यक्ष सुनील उंबरे उपस्थित होते. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले व विक्रम बिस्कीटे यांनी केले. यानंतर बंडा जोशी, वंदन नगरकर यांचा हास्यकल्लोळ व संतोष चोरडिया यांच्या नृत्याविष्कार कार्यक्रम सादर करण्यात आला.
----------------------------------------------
-++++++++++++++++++++++++++++++++++++
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....
http://market.android.com/

----------------------
बघत रहा "पंढरपूर लाईव्ह"
"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 4 जानेवारी 2015 रोजी 38, 176 एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत
4 जानेवारी 2015 रोजी तब्बल 1985 अँन्ड्राँईड मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ... या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा
ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती
http://market.android.com/ search?q=pname%3Acom.wPandh arpurLive
आपला :-- भगवान वानखेडे (संपादक)
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com






0 Comments