माजी मंत्री महोदयांची सुरक्षा व्यवस्था घटवली....

पंढरपूर लाईव्ह

राज्यातील सत्ताधारी भाजप्रणित सरकारने मागील आघाडी सरकारमधील बहुतांश मंत्री व महत्त्वाच्या नेत्यांची सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे काढण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.  या निर्णयामागे राजकीय द्वेषाची भावना असल्याची टीका विरोधक करत आहेत.

याआधी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशा एकूण १३ व्यक्तींना झेड प्लस सुरक्षा होती. यासंदर्भातील उच्चस्तरिय समितीने मंत्री तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना सध्या पुरविण्यात येणाऱ्या सुरक्षेचा आढावा घेऊन अनेकांची सुरक्षा घटवण्यात आली आहे. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (झेड) , माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (वाय), माजी मंत्री नारायण राणे (एक्स), माजी मंत्री छगन भुजबळ(एक्स), माजी गृहमंत्री आर. आर. पाटील (एक्स), माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल (एक्स) यांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची सुरक्षा झेडवरून एक्स केली आहे.


याशिवाय माजी उप मुख्यमंत्री अजित पवार, माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील, माजी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री सुनील तटकरे, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री नसीम खान यांच्यासह निलेश आणि नितेश राणे, राणा जगजित सिंह ​शिवराम दळवी, परशुराम उपरकर यांची सुरक्षा पूर्णपणे काढण्यात आली आहे.

सरसंघचालक प्रमुख मोहन भागवत (झेड प्लस), शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (झेड), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (झेड), पोलिस आयुक्त राकेश मारिया (झेड प्लस), एटीएसचे प्रमुख हिंमाशू रॉय (झेड), ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (झेड) यांची सुरक्षा आहे तशीच कायम ठेवण्यात आली आहे. याशिवाय एकनाथ खडसे, एकनाथ शिंदे, सुधीर मुनगंटीवार, राम शिंदे, रणतिज पाटील आदींना वाय दर्जासह एस्कॉर्ट अशी सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे.

अशी सुरक्षा

राज्यातल्या राजकीय नेत्यांना तसेच इतर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना त्यांच्या पदानुसार स्पेशल प्रोटेक्शन युनिटद्वारे (एसपीयू) एक्स, वाय, झेड आणि झेड प्लस अशा चढत्या श्रेणीनुसार पोलिस संरक्षण दिले जाते. एक्स दर्जासाठी सर्वात कमी म्हणजे एक पोलिस कॉन्स्टेबल तर झेड प्लस दर्जासाठी दहा बारा पोलिस अधिकारी- कर्मचारी, बुलटेप्रूफ कार, दोन एस्कॉर्ट गाड्या असा ताफा असतो. ज्यांना सुरक्षा पुरविली जाते, त्यांना खरेच सुरक्षेची गरज आहे का याचा उच्च स्तरीय समितीकडून वेळोवेळी आढावा घेतला जातो. या समितीत राज्याच्या गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त, राज्यातील सर्व पोलिस आयुक्त, विशेष शाखेचे उपायुक्त आदी असतात.


माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण, माजी उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या पत्नी निलम राणे, माजी उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची सुरक्षा पूर्णपणे काढण्यात आली आहे. मात्र शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांची एक्स दर्जाची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनाही एक्स दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. 

*************

___________________________________



बघत रहा "पंढरपूर लाईव्ह"


"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 3 जानेवारी 2015 रोजी  37, 651  एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत


3 जानेवारी 2015 रोजी तब्बल 1915 अँन्ड्राँई मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ...  या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.


पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....

पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा


ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती

http://market.android.com/search?q=pname%3Acom.wPandharpurLive

 


आपला :-- भगवान वानखेडे (संपादक)

मोबा. नं.  8055434499  /  8308838111
 

  आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com


 

Post a Comment

0 Comments