पंढरपूरमध्ये भिसीच्या हप्त्याला पैसे नसल्याने युवकाची आत्महत्या

पंढरपूरमध्ये भिसीच्या हप्त्याला पैसे नसल्याने युवकाची आत्महत्या

पंढरपूर दि. 25- येथील चंद्रभागा नदीच्या पात्रात असणार्‍या बंधार्‍यामध्ये आज एका युवकाचा मृतदेह आढळून आला. अधिक माहिती घेतली असताना हा मृतदेह पंढरीतील लक्ष्मीनगर झोपडपट्टी येथे रहाणारे अकील गफूर तांबोळी (वय 41) यांचा असल्याचे समजले. याबाबत मयताचे बंधु शकील गफूर तांबोळी यांनी शहर पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार अकील तांबोळी हे दि. 23 जानेवारी 2015 पासून बेपत्ता होते. त्यांनी पंढरपूरमधील कांही भिसीचालकाकडून भिसीचे पैसे उचललेले होते. मात्र या भिसीच्या हप्त्याचे पैसे द्यायचे राहिलेले होते. गेल्या कां ही दिवसापासून ते या चिंतेने ग्रासलेले  होते. भिसी चालकांच्या तगाद्याला कंटाळून त्यांनी बंधार्‍यात उडी घेवून आत्महत्या केल्याची चर्चा ऐकावयास मिळते.  

मयत अकील तांबोळी हे कर्जबाजारी झाले होते. गेल्या कांही दिवसापासून ते घरातही नव्हते.  त्यांच्या कुटूंबातील कुणीही कुणावर संशय व्यक्त केलेला नाही. याबाबत मयताच्या कुटूंबातील कुणाचीही  तक्रार नसल्याची किंवा कुणावर संशय नसल्याची  माहिती  या घटनेचा तपास ज्यांच्याकडे आहे ते शहर पोलिस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल सावंत यांनी ‘पंढरपूर लाईव्ह’ सी बोलताना दिली. याबाबत अधिक तपास चालु आहे. असेही ते म्हणाले.

पंढरपूरमध्ये विविध भागात अवैध रित्या ‘भिसी’ राजरोसपणे चालते. कांही धनीक लोक एकत्र येतात. आपल्याकडील पैसे जमा करुन दर आठवड्याला किंवा महिन्याला ‘भिसी’ म्हणून ज्यांना गरज असेल त्यांना वाटले जातात. यामध्ये ‘लिलाव भिसी’ नावाचा प्रकार अतिशय भयंकर असतो. यामध्ये जमा झालेल्या पैशाची बोली लावली जाते. ज्याला अधिक गरज असेल तो जास्तीत जास्त तोट्यामध्ये अशी भिसी उचलतो. बोली लावणार्‍यामध्ये यातीलच कांही धनीक मुद्दामहून कमी पैशाने बोली लावतात. थोडक्यात हा ‘भिसी’ नावाचा प्रकार म्हणजे चक्क अडल्या-नडलेल्या लोकांची आर्थिक, मानसिक आणि सामाजिक पिळवणुक आहे. अशी भिसी चालविणारे गब्बरगंड असतात मात्र गरजु गरीब लोक या जंजालात अडकतात. गरजेपोटी अव्वाच्या सव्वा व्याजाचे हप्ते भरण्याची तयारी दाखवत गरजु लोक अशअशा भिसीतून पैसे उचलतात. भिसीच्या मिळालेल्या पैशातून आपली गरज भागवणार्‍या गरजवंताला यानंतर मात्र भिसीचे उचललेले पैसे सव्याज हप्त्या-हप्त्याने परत करावयाचे असतात. आणि यानंतर सुरु होते ‘दुष्टचक्र’.... भिसी उचलणारा गरजवंत जर कमावता असेल तर त्याचे हप्ते वेळेत जातात. व्याजासह तो इमानेइतबारे आपल्याकडील रक्कम परत करतो. मात्र ज्या गरजवंत भिसी उचलणाराच्या हाताला काम नसते किंवा ज्याचा धंदा बुडालेला असतो असा गरजवंत पहिल्या भिसीच्या हप्त्याची भरपाई करण्यासाठी दुसरी भिसी उचलतो... त्यानंतर तिसरी... चौथी... असा टप्प्या टप्प्याने कर्जबाजारी बनलेला हा गरजवंत पुरता हतबल होऊन जातो.... कधीच बाहेर न पडता येणारे हे दुष्टचक्र एक दिवस माणसाला माणसातून उठवते.... जीवन नकोसे करते... असाच काहीसा  प्रकार मयत शकील तांबोळीच्या बाबतीत घडलेला  आढळून येतो.  या भिसीच्या जंजाळात  अडकलेल्या कित्येकांनी भिसीचालकांच्या भीतीपोटी किंवा समाजात मानहानी होईल या काळजीपोटी पंढरपूर सोडल्याच्या कांही घटना सुध्दा घडलेल्या आहेत.... मात्र तरीही पंढरपूरमध्ये अशी अवैधरित्या ‘भिसी’  चालविणार्‍यांची संख्या अधिक आहे. याबाबत कोणतीही तक्रार दाखल होत नाही... की कारवाई होत नाही...  गोरगरीबांचे संसार देशोधडीला लावणार्‍या ‘खाजगी सावकाराचा नवा अवतार’ ठरणार्‍या अशा भिसी चालकांना तात्काळ उघडे पाडून त्यांच्या विरुध्द तक्रारी दाखल करणे हे सर्वसामान्यांचे व यातील फसवल्या गेलेल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे.   प्रशासनानेही आपल्या पध्दतीने पंढरपूरमध्ये वेगवेगळ्या भागात चालणार्‍या अशा भिसी चालकांना शोधून अशा घटनेला आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलणे अत्यावश्यक आहे.

हे.


"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 19 जानेवारी 2015 रोजी  45,141 एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत   19 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2916 अँन्ड्राँई मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ...  या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.


पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....

पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा

                    ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती.

http://market.android.com/search?q=pname%3Acom.wPandharpurLive

  आपला :-- भगवान गणपतराव वानखेडे (संपादक) 

   आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

 मोबा. नं.  8055434499  /  8308838111

 ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com

..........................


Post a Comment

0 Comments