पंढरपूर लाईव्ह
पंढरपूर ः दि.16 - पंढरपूर शहरातील श्री विठ्ठल हॉस्पिटल येथे आज स.10.30 वाजता पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री भारतनाना भालके व स्वदेश हेल्थ फौंडेशन व पवना हॉस्पिटल,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले
सदरवेळी पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके म्हणाले की, सदर शिबिराचे आयोजन हे माझ्या मतदार संघा पुरतेच मर्यादित नव्हे तर संपूर्ण पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यासाठी केले आहे. माझ्याकडे दवाखान्यासाठी मदत मिळावी म्हणून वारंवार मागणी होत असते व आर्थिक मदतही करतो. तसेच दवाखाना कामी वेगवेगळ्या योजनांसाठी शिङ्गारस पत्रेही मी प्रत्येकास देतो. त्याचा विचार करूनच मी ठरविले आहे की, तीन महिन्यातून एकदा वेगवेगळे आरोग्य शिबिर हे श्री विठ्ठल हॉस्पिटल मध्ये भरविणार आहे.
यावेळी ह.भ.प.जयवंत बोधले महाराज म्हणाले की, सामाजिक जाणीवेतून झालेले हे एक सत्कार्य आहे. आमदार भारत नानांना पंढरपूर व मंगळवेढा तालुक्याची नस चांगली समजलेली आहे. तसेच ज्या व्यक्तीला चिंता आहे त्याला सुखही नाही आणि झोपही नाही. ज्या व्यक्तीचे आरोग्य चांगले तीच व्यक्ती सर्वात सुखी असते असे महाराज म्हणाले. या शिबिराच्या निमित्ताने आमदार भारत भालके साहेबांनी खर्या अर्थाने मानवाला वाचविले असे महाराज म्हणाले.
सदर कार्यक्रमास श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक सर्वश्री जयनाना देशमुख, दिपक सदाबसे, चांगदेव कदम, मधुकर गिड्डे, नंदकुमार पाटील, धोंडिबा वाघमारे, दिलीप पुरवत, माणिक बाबर, द्रोणाचार्य हाके, प्रशांत देशमुख, प्रशांत शिंदे तसेच तिर्थक्षेत्र आघाडीचे अध्यक्ष श्री सुधीर धुमाळ व नगरसेवक सर्वश्री संजय घोडके, सतीशबापू घंटे, बाळासाहेब नेहतराव, शिवाजी मस्के, धनंजय कोताळकर यांचेसह सर्वश्री सुभाष हुंगे-पाटील, शिवाजी हुंगे-पाटील, सुधीर भोसले, किरणराज घाडगे, आनंद पाटील, उमेश वाघोलीकर, विठ्ठल शेट्टी धोत्रे, सायबु चौगुले, संजयआप्पा भिंगे, अनवलीचे सरपंच सुनिल वाघमारे, सतीश शिंदे, लक्ष्मण वाघमोडे, भिमराव माळी, भारत माळी, दिनकर कदम, शिवाजी आसबे, धनाजी घाडगे, मामा फलटणकर, संदीप पाटील, आप्पा राऊत, विठ्ठल रोंगे यांचेसह अनेक कार्यकर्ते व रूग्ण तसेच श्री विठ्ठल हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स व संपूर्ण स्टाङ्ग उपस्थित होते. त्याचप्रमाणे श्री विठ्ठल हॉस्पिटलचे सर्वश्री शरदबापू चव्हाण, जीवराजबापू चव्हाण, अॅड.आनंद पाटील, प्रविण भोसले व काकासोा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ.श्री अमरसिंह जमदाडे व सूत्र संचालन श्री विठ्ठलराव नागटिळक सर यांनी केले.







0 Comments