मकरसंक्रांतीनिमित्त पंढरपूरसह महाराष्ट्रातील हजारो महिलांनी घेतले रुक्मिणीमातेचे दर्शन

पंढरपूर लाईव्ह

पंढरपूर- मकरसंक्रांतीनिमित्त पंढरपूर शहर व परिसरातील महिलांसह महाराष्ट्रातील हजारो महिलांनी  रुकमिणीमातेचे दर्शन घेऊन हळदी कुंकू अर्पण केले. मकरसंक्रांतीच्या सणाला महाराष्ट्रात खुप महत्व आहे. या दिवशी एकमेकांना तीळ-गुळ देवून गोड-गोड बोला अशी विनंती केली जाते. या सणामध्ये पंढरपूरच्या मुख्य विठ्ठल रुक्मिणी मंदिरातूल रुक्मिणी मातेला व दिंडीरवनातील (उध्दव घाटानजीक गोविंदपूरा येथे असलेले रुक्मिणीदेवीचे मंदिर) मंदिरात असणार्‍या रुक्मिणीमातेला महिलांनी हळदी कुंकू-खण-चुडा वाहाणे (ओवासणे) ची परंपरा आहे. या दिवशीची कांही क्षणचित्रे पंढरपूरचे सुप्रसिध्द  प्रेस फोटोग्राफर श्री.उमेश टोमके व आमचे मित्र पत्रकार विजय काळे यांनी काढलेले आहेत. ते खास पंढरपूर लाईव्ह च्या दर्शकांसाठी प्रसिध्द करत आहोत...

श्री.उमेश टोमके यांनी काढलेली विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील ही छायाचित्रे...

श्री.विजय काळे यांनी काढलेली   दिंडीरवनातील रुक्मिणीदेवी चे व मंदिर परिसरातील ही छायाचित्रे... ...........................



"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 17 जानेवारी 2015 रोजी  44,012 एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत   17 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2743 अँन्ड्राँई मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ...  या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.

पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....

पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा

                    ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती.

http://market.android.com/search?q=pname%3Acom.wPandharpurLive

  आपला :-- भगवान गणपतराव वानखेडे (संपादक) 

   आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

 मोबा. नं.  8055434499  /  8308838111

 ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com

..........................

 

Post a Comment

0 Comments