दि पंढरपूर अर्बन को-ऑप.बँक लि.पंढरपूर तर्फे आयोजित युवा प्रतिभा महोत्सवास सुरवात

पंढरपूर लाईव्ह

पंढरपूर 16 :

दि पंढरपूर अर्बन को-ऑप.बँक लि.पंढरपूर तर्फे आयोजित युवा प्रतिभा महोत्सवास दि.16 जानेवारी रोजी शालेय प्रतिभा महोत्सवाचे उदघाटनाव्दारे सुरवात झाली. खासदार मा.श्री.शरदजी बनसोडे, बँकेचे कुटुंबप्रमुख मा.श्री.सुधाकरपंत परिचारक, एलिझाबेथ एकादशीमधील बालकलाकार तसेच पंढरपूरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक त्यांचे हस्ते शालेय प्रतिभा महोत्सवाचे उद2घाटन श्रीपांडुरंग व नटराजाचे पुजन करून करणेत आले. तसेच यावर्षी जीवनगौरवाचा सन्मान ज्येष्ठ ढोलकी वादक श्री.गोविंदराव वनारे व इतिहास संशोधक श्री.गोपाळराव देशमुख यांना देणेत आला. तसेच बँकेतर्फे सर्व शाळांतील मुख्याध्यापकांना भारत स्वच्छता अभियानाअंतर्गत स्वच्छता कीट, सन्मानचिन्ह व श्रीफळ देवून सत्कार करणेत आला.


प्रास्ताविकात बोलताना बँकेचे चेअरमन श्री.प्रशांत परिचारक म्हणाले की, पंढरपूर परिसरातील सगळ्या शाळांना एक प्रशस्त व्यासपीठ मिळवून त्यांचेतील कलागुणांचे दर्शन पंढरपूरकरांना व्हावे व त्यांचेतून मोठे कलाकार घडावेत हाच या शालेय प्रतिभा महोत्सवाचा हेतु आहे. तसेच पंढरपूरातील या तिसर्‍या युवा प्रतिभा महोत्सवासाठी राज्यभरातील युवा कलाकारांच्या स्पर्धेपुर्वी ऑडीशनव्दारे निवड होवून आमंत्रित करणेत आले आहे. खासदार मा.श्री.शरदजी बनसोडे यांनी आपल्या कलाकाराच्या शैलीमध्ये बोलताना, एलीझाबेथ एकादशीमधील कलाकारांना अभिनयाच्या शुभेच्छा देवून या युवा महोत्सवामधून पंढरीच्या मातीत जसा भ3तीचा रंग आहे, तसेच कलावंतांना या राज्यस्तरीय व्यासपीठाव्दारे अनेक कलाकार घडावेत अशी

सदिच्छा व्य3त केली. तसेच पंढरपूर अर्बन बँक फ3त आर्थिक व्यवहाराच्या पलीकडे जावून प्रतिवर्षी अशा विविध उपक्रमामध्ये सामाजिक बांधिलकी जपत आहे. यावेळी बँकेचे कुटुंबप्रमुख श्री.सुधाकरपंत परिचारक यांनी युवा महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या कलाकारांना शुभेच्छा दिल्या.

स्वागत बँकेचे संचालक मुन्नागीर गोसावी तर आभार संचालिका मेधा दाते यांनी मानले. यावेळी जीवनगौरव
पुरस्काराचे मानकरी गोपळराव देशमुख यांनी मनोगत व्ये केले.  प्रारंभी सकाळी राज्यस्तरीय युवा प्रतिभा महोत्सवा अंतर्गत चित्रकला व शिल्पप्रतिभा तसेच काव्यप्रतिभा, एकपात्रीप्रतिभा या स्पर्धेस सुरवात झाली. या स्पर्धेत महाराष्ट ्राचे कानाकोपर्‍यातून चित्रकार स्पर्धक जमले होते. चित्रकला व शिल्पकला स्पर्धेत पंढरपूरातील सर्व प्राचीन व ऐतिहासिक वास्तू यांचे चित्र रेखाटले. सदर चित्र व शिल्प प्रतिभाचे तसेच वाचन प्रतिभेचे उद2घाटनही सायंकाळी मा.खासदार श्री.शरदजी बनसोडे यांचे शुभहस्ते होवून पुढील तीन दिवसासाठी टिळक स्मारक मंदिर हॉल येथे दररोज सायं.6 ते 9 या वेळेत प्रदर्शनासाठी ठेवणेत येणार आहे याचा पंढरपूरकरांनी लाभ
घ्यावा असे आवाहन बँकेचे चेअरमन श्री.प्रशांत परिचारक यांनी केले.

याप्रसंगी व्यासपीठावर कवि नारायणजी सुमंत, हभप वा.ना.उतपात दिनकरभाऊ मोरे, दाजी भुसनर, मान्यवर म्हणून पंढरपूरातील सर्व शालेय मुख्याध्यापक, बँकेचे सर्व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.लक्ष्मण डिंगरे, सरव्यवस्थापक श्री.उमेश विरधे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी बँकेचे संचालक मुन्नागीर गोसावी, शांताराम कुलकर्णीसर, नंदकुमार कुलकर्णीसर, विलास जोशी, अमित वाडेकर, आदींनी परिश्रम घेतले. युवा महोत्सवात 17 ते 19 जानेवारी दरम्यान दररोज सायं.6 वाजता अंतिम फेरी होणार आहेत याचा पंढरपूरकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.

...................

"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 17 जानेवारी 2015 रोजी  44,012 एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत   17 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2743 अँन्ड्राँई मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ...  या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.

पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....

पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा

                    ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती.

http://market.android.com/search?q=pname%3Acom.wPandharpurLive

  आपला :-- भगवान गणपतराव वानखेडे (संपादक) 

   आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

 मोबा. नं.  8055434499  /  8308838111

 ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com

..........................

 




Post a Comment

0 Comments