पंढरपूर लाईव्ह
पंढरपूर । प्रतिनिधी।
ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची तमा न बाळगता अनेक संकटांचा सामना करत पहाटेपासून सायकलवर फिरत घरोघरी पेपर टाकणार्या वृत्तपत्र विक्रेत्यांचे काम हे अत्यंत खडतर असेच आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न सोडविण्यासाठ लोकप्रतिनिधी व पत्रकारांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. पेपर वाटपाचे काम करीत असताना विक्रेत्यांना अनेक संकटांचा समाना करावा लागतो. पेपर वाटत असताना विक्रेत्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचा घटना काही ठिकाणी घडल्या आहेत. त्यामुळे विक्रेत्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने त्यांनी अपघात विमा उतरविणे गरजेचे आहे. जनकल्याण च्या माध्यमातून आपण शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा जनरल अपघात विमा उतरविणार असल्याचे प्रतिपादन सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी केले. पंढरपूर शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दिनदर्शिका 2015 च्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. हॉटेल विठ्ठल एन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक हे होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करून दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. संघटनेच्या पदाधिकार्यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षपदावरून बोलताना माजी आ.सुधाकरपंत परिचारक म्हणाले, पेपर विक्रेत्यांचे काम हे अतिशय त्रासदायक असून त्यांच्यासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पत्रकारांनी याबाबत आवाज उठविणे गरजेचे आहे. तसेच पत्रकार भवनाचा गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रश्न लोकप्रतिनिधी, पत्रकार, विक्रेते यांनी एकत्रितपणे चर्चा करून सोडवावा, असे आवाहन केले.
हमाल-मापाडी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष व दै.पंढरी भूषणचे संपादक शिवाजीराव शिंदे म्हणाले, वृत्तपत्र विक्रेता हा असंघटीत कामगार वर्गामध्ये येणारा घटक आहे. आपल्या अडचणी सोडविण्यासाठी विक्रेत्यांनी संघटीत होणे गरजेचे आहे. असंघटीत कामगार व पेपर विक्रेत्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण हमाल-मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ.बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत असल्याचे सांगितले. माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचा हा दिनदर्शिकेचा उपक्रम स्तुत्य असून विक्रेत्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच पत्रकार भवनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी न.पा. अधिकार्यांशी चर्चा करून आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. प्रास्ताविक राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संघटन सचिव गोरख भिलारे यांनी केले. त्यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांना येणार्या अडचणी मांडून ऊन, वारा, पाऊस, थंडी या संकटाचा विक्रेत्यांना सामना करावा लागतो. त्यामुळे पेपरचे वितरण करण्यासाठी व विक्रेता भवनासाठी नगरपरिषदेने नाममात्र भाडे तत्वावर जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष अभिराज उबाळे, संघटनेचे अध्यक्ष महेश पटवर्धन व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास मा. नगरसेवक नागेश भोसले, पत्रकार अतुल बडवे, अभय जोशी, प्रकाश पटवर्धन, आनंद तेंडुलकर, उपाध्यक्ष मुकुंद हरिदास यांच्यासह पत्रकार, जाहिरातदार, विक्रेते सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन जेष्ठ पत्रकार नंदकुमार देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन सचिव विकास पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष कुलकर्णी, सतिश लाड, लक्ष्मण कारटकर, शेखर तेंडुलकर, बाळासाहेब जोशी, हरी कदम, विकरण वांगीकर, उमेश फावडे, महादेव वाटाणे, रामा शिंदे, दत्तात्रय खटवटे व विक्रेत्यांनी परिश्रम घेतले.
---------------------------------------------
बघत रहा "पंढरपूर लाईव्ह"
"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 8 जानेवारी 2015 रोजी 39,438 एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत
8 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2135 अँन्ड्राँईड मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ... या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा
ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी
खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही
नम्र विनंती
http://market.android.com/ search?q=pname%3Acom.wPandh arpurLive
आपला :--
भगवान वानखेडे (संपादक)
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com






0 Comments