पंढरपूरमधील के.बी.पी. चौक प्रवासासाठी खतरनाक

आज घडलेल्या एका अपघातात बाईकस्वार बालंबाल वाचला...

अपघातांचे वाढते प्रमाण...

आकारमानाने हा चौक लहान...

वाहतुकीची कोंडी ही नेहमीची बाब...

या चौकातून होते मोठी रहदारी....

भरधाव वेगाने येणार्‍या अवजड वाहनांचा राबता याच चौकातून....

चौकातील चबुतरा असून अडचण नसून खोळंबा...

कायमस्वरुपी ट्रॅफिक पोलिसांची नियुक्ती हवी...

या चौकानजीक असणार्‍या के.बी.पी. पाटील कॉलेज समोर गतीरोधक बसवले होते. मात्र हे गतीरोधक गायब झालेले आहेत. त्यामुळे भरधाव वेगात धावणार्‍या वाहनांना इथे ‘ब्रेक’ लागत नाही... ब्रेक बसतोय तो सर्वसामान्यांच्या काळजाला... कधी कुठून कोणते वाहन येवून आपणास धडकेल या भीतीने या चौकातून महिला व वयोवृध्द नागरीक तसेच विद्यार्थी जीव मुठीत धरुन प्रवास करत असतात.

पंढरपूर लाईव्ह भगवान वानखेडे- दि. 8 जानेवारी 2015

 पंढरपूर-पुणे मार्गावरील पंढरपूर शहरातील सर्वात महत्वाचा चौक म्हणजे क्रांतीसिंह नाना पाटील चौक (के.बी.पी.चौक) हा असून या  चौकामध्ये विविध अपघातांत अनेकांचे बळी गेलेले आहेत. आजच दि. 8 जानेवारी 2014 रोजी शेळवे, ता. पंढरपूर येथील मोटारसायकलवर असणार्‍या एका  सद्गृहस्थांना याच चौकात एका ऑईल भरलेल्या टँकरने धडक दिल्याने त्यांच्या पायाला गंभीर इजा पोहचल्याचा प्रकार घडला आहे. या अपघातामध्ये अपघातग्रस्त बाईक टँकरच्या खाली गेलेली आढळली. बाईकस्वार बालंबाल बचावले. येथील अपघातांचे वाढते प्रमाण पहाता सर्वसामान्यांना प्रवासासाठीचा हा चौक सर्वात ‘खतरनाक’ बनलेला आहे. या चौकात पोलीस चौकी आहे मात्र येथे दिवसभर रिकामटेकड्यांचाच ठिय्या असतो. याठिकाणी कायमस्वरुपी वाहतुक पोलिसांची नेमणूक करणे आवश्यक आहे मात्र याकडे वारंवार का दुर्लक्ष केले जाते? या प्रश्‍नाचे उत्तर मिळत नाही.


या चौकातून नविन पुलाकडे जाण्यासाठी बायपास रस्ता आहे मात्र अनेक ट्रक व टिपर चालक या बायपास रस्त्यावरुन न जाता पंढरपूर शहरातून भरधाव वेगात जातात. यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होते.  लहान मोठे अपघात होणे येथे नविन नाही. पुण्याच्या दिशेकडून येणारी... कोल्हापूर सातार्‍याकडून येणारी अवजड वाहतुक येथूनच भरधाव वेगात होते. जवळच कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, यशवंत विद्यालय, इंग्लिश मिडीयम स्कुल, राजाराम इंग्लिश मिडीयम स्कुल, कवठेकर प्रशाला आदी शैक्षणीक संस्था आहेत. त्यामुळे या चौकातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी  प्रवास करत असतात. म्हणूनच या चौकातील वाहतुकीला शिस्त लावणे अत्यावश्यक आहे. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत अनेक युवक भरधाव वेगात बाईक्स् पळवताना सर्रास आढळतात... त्यातल्या त्यात शैक्षणिक संस्थांकडे जाणार्‍या रस्त्यावरील प्रवास म्हणजे सर्वसामान्यांसाठी ‘जीव मुठीत धरुन’ केल्यासारखाच आहे. याला आळा बसण्यासाठी पंढरपूर शहर वाहतुक शाखेच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देवून योग्य त्या उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.
---------------------------------------------




-++++++++++++++++++++++++++++++++++++

बघत रहा "पंढरपूर लाईव्ह"



"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 8 जानेवारी 2015 रोजी  39,438  एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत



   8 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2135 अँन्ड्राँई मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ...  या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.


पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....


पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा


ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती

http://market.android.com/search?q=pname%3Acom.wPandharpurLive

  

आपला :-- 

भगवान वानखेडे (संपादक) 

मोबा. नं.  8055434499  /  8308838111
   आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com


Post a Comment

0 Comments