पंढरपूर लाईव्ह
बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली हळणवर यांच्यावर खुनी हल्ला करणार्या गुन्हेगारांना तडीपार करावे अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री प्रा.राम शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनानुसार, ईश्वर वठार गावातील सुखदेव दगडु चौगुले व प्रकाश सुखदेव चौगुल व दगडु रोकडे हे सराईत गुन्हेगार असुन या आरोपींची या भागात मोठी दहशत आहे.व सदर आरोपींचा बेकायदा सावकारीचा व्यवसाय आहे.‘माझा नातेवाईक पोलीस आहे,माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही अशी धमकी हे आरोपी सर्वसामान्य नागरिकांना नेहमी देत असतात. पंढरपूर तालुक पोलीस ठाण्यात तसेच उस्मानाबाद व मंगळवेढा येथील पोलीस ठाण्यातही सदर आरोपींच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदर आरोपींनी दहशतीच्या बळावर अनेक लोकांना नाहक त्रास दिला आहे.कायद्याची भीती आम्ही बाळगत नाही असे हे आरोपी बोलुन दाखवत असुन गावातील अनेकांना यापुर्वीही त्यांनी सावकारीच्या रकमापोटी मारहाण केली आहे.हे आरोपी गावात नेहमी दारु प्राशन करुन सर्वसामान्य नागरिकांना मारहाण करणे,शिवीगाळ करणे,दमदाटी करणे असे प्रकार करीत असतात.सदर आरोपींचा गावाला नाहक त्रास सहन करावा लागत असुन सदर सुखदेव दगडु चौगुले व प्रकाश सुखदेव चौगुल यांना हद्दपार करावे अशी मागणी या निवेदनाद्वारे बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष नितिन बागल यांनी केली आहे.यावेळी भाजपा अनुसुचित जाती जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष अनिल बोराडे,भाजपा माजी तालुकाध्यक्ष संतोष गाडे,अंकुश भुईटे,नंदकुमार व्यवहारे धनगर आरक्षण कृती समितीचे सदस्य परमेश्वर कोळेकर,डॉ.शशिकांत तरंगे आदी उपस्थित होते.
................................................

"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 17 जानेवारी 2015 रोजी 43,982 एवढी आहे...
"पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना
झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत 17 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2736 अँन्ड्राँईड मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या
मोबाईलमध्ये घेतले ... या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.
0 Comments