पंढरपूर लाईव्ह
पंढरपूर दि. 17 जानेवारी 2015कर्जबाजारीपणाला कंटाळून तपकीरी शेटफळ (ता.पंढरपूर, जि.सोलापूर) येथील ज्ञानेश्वर महादेव कोळी (वय-50) या शेतकर्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी चार च्या सुमारास घडली.
मृत कोळी हे अल्पभुधारक शेतकरी होते. गेल्या दोन वर्षापासून निसर्गाने साथ न दिल्याने लागवडीचा खर्च देखील निघत नसल्याने कोळी चिंतीत होते. बँकेचे सात ते आठ लाख रुपयांचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत त्यांनी आज दुपारी विषारी औषध प्राशन केले. पंढरपूरकडे उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा करुण अंत झाला.
..................................................पंढरपूर तालुक्यातील या घटनेतून हेच सिध्द होते की, सततच्या दुष्काळा मुळे कधी नव्हे तो यंदा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरीही हैरान झालेला आहे. दुबार पेरण्या करुनही हाता काहीच लागलेले नसल्याने शेतकर्यांच्या दु:खात भर पडलेली आहे. अवकाळी पाऊस, गारपीट अशा एकापाठोपाठ आलेल्या आस्मानी संकटापुढे शेतकरी हतबल झालेला आहे. प्रसंगी कर्ज काढून बी-बियाणे-खते-औषधे विकत आणायची... रात्रंदिवस ऊन्ह वार्याची पर्वा न करता रक्ताचं पाणी करुन शेतात राबायचं... आणि एवढं करुनही हाताला घामाचा दाम मिळण्याऐवजी कर्जाचं ओझं डोक्यावर वाढलेलं पाहून शेतकरी हताश झालेला आहे. अशा परिस्थितीत शेतकर्यांना आधार देणं हे शासनाचं कर्तव्य आहे. प्रशासनाने या गोष्टीची गंभीर दखल घेत शेतकर्यांना दिलासा मिळेल यासाठी आवश्यक ती पावले तत्परतेने उचलणे अत्यावश्यक बनले आहे.







0 Comments