पंढरपूर लाईव्ह
दि. 16/01/2015पंढरपूर:- श्री.विठठ्ल इन्स्टिटयूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित, इन्स्टिटयूट ऑफ कॉम्प्युटर अॅन्ड मॅनेजमेंट स्टडीज्, कासेगांव, पंढरपूर मध्ये बी.सी.ए.-3 या वर्गात शिक्षण घेत असलेल्या कु. निता सतीश कळसकर व कु. पुजा विनायक माने यांची मुंबई येथील आंतरराश्ट्रीय दर्जाच्या एमएस् ओएस थ्री इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या सॉफ्टवेयर कंपनी मध्ये कॅम्पस इंटरव्यूव्हद्वारे ट्रेनी सॉॅफ्टवेअर इंजिनियर म्हणून नुकतीच निवड झाली. आय. सी.एम.एस.चे विद्यार्थी हे प्रत्येक वर्षी विविध कंपन्या मध्ये निवडले जातात.या वर्षी हि पहिल्याच कंपनी कॅम्पस ला दोन विद्यार्थीनंींची निवड झाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे, अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष एच.एम.बागल,विश्वस्त बी.डी.रोंगे तसेच प्राचार्य डॉ. के.एन.गणगे, लोटस इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या डॉ.जयश्री चव्हाण,प्रा.आय.डी.मुजावर, अन्य प्राध्यापक व पालक वर्ग यांनी अभिनंदन केले.







0 Comments