पंढरपूरमध्ये तब्बल 5 तास वीज गायब नागरिकांची कामे खोळंबली.... पंढरपूरकर त्रस्त....

पंढरपूर लाईव्ह

दि.18 फेब्रुवारी 2015


आज दुपारी 1 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत तब्बल 5 तास वीज नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. पंढरपूरमध्ये लोडशेडींग बंद असूनही एवढा वेळ वीज का गेली याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अचानक खंडीत झालेल्या वीजपुरवठ्यामुळे पंढरपूरकरांची एकच तारांबळ उडालेली पहावयास मिळाली. इंटरनेट संबंधीचे व्यवहार ठप्प झाले. याचा प्रतिकुल परिणाम पंढरपूरमधील आर्थिक, औद्योगीक, व्यापार, शैक्षणीक, आरोग्य अशा सर्वच क्षेत्रात जाणवला.


याबाबत महावितरण च्या पद्मावती तक्रार निवारण केंद्रात ‘पंढरपूर लाईव्ह’ चे संपादक भगवान वानखेडे यांनी लॅन्डलाईन क्रमांक (02186) 223226 वर विचारणा केली असता सांगण्यात आले की, पंढरपूरचे लोडशेडींग बंद आहे. मात्र  सांगोला रोडवरील 220 के.व्ही. सबस्टेशन येथून (जेथून पंढरपूर शहराला वीजपुरवठा केला जातो) तेथूनच वीज पुरवठा बंद केला गेला आहे. तो का केला याचे कारण येथून समजले नाही. यानंतर सांगोला रोडच्या वरील कार्यालयातील दुरध्वनी क्रमांक (02186) 223950 या क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता येथील दुरध्वनी कोणीही घेतला नाही.

याबाबत पंढरपूर शहर महावितरणचे श्री.एन.सी. बिट्रा यांच्या मोबाईलवर कॉल करुन विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ‘‘220 के.व्ही सबस्टेशन सांगोला रोड येथून कांही कामानिमित्त वीज पुरवठा खंडीत केला होता.’’ याबाबत आपणास किंवा नागरिकांच्या माहितीसाठी कोणती पुर्वसुचना दिली होती का? यावर ते म्हणाले की कोणत्या तरी वर्तमानपत्रात याबाबतची जाहिरात त्यांनी दिली असेल. कोणत्या वर्तमानपत्रात जाहिरात दिली यावर मात्र ते निरुत्तर होत म्हणाले की, ‘‘याबाबत अधिक माहिती सांगोला रोडच्या त्या कार्यालयातील दुरध्वनीवरच मिळेल.’’ हा क्रमांक डायल केल्यास उत्तर मिळत नाही असे विचारल्यास ते म्हणाले की, कामात असतील कांही वेळाने करा... पावणे सात वाजेपर्यंत या क्रमांकावर कॉल केले मात्र कुणीही ‘कॉल’ घेतला नाही.

सांगोला रोडवरील ज्या 220 के.व्ही. सबस्टेशनमधून हा विद्युत पुरवठा खंडीत केला गेला तेथील संबंधीत अधिकार्‍यांनी याबाबतची पुर्वसुचना पंढरीतील नागरिकांना मिळेल यासाठी कालच स्पीकरद्वारे माहिती देणे आवश्यक होते. जेणे करुन नागरिकांना आपल्या कामामध्ये (जी कामे विजेवर अवलंबून असतात अशी) योग्य ते नियोजन करता आले असते.  मात्र तसे झाले नाही. अनेक नागरिकांना याबाबतची माहिती नसल्यामुळे अचानक खंडीत झालेल्या वीजपुरवठ्यामुळे पंढरपूरकरांची एकच तारांबळ उडालेली पहावयास मिळाली. इंटरनेट संबंधीचे व्यवहार ठप्प झाले. याचा प्रतिकुल परिणाम पंढरपूरमधील आर्थिक, औद्योगीक, व्यापार, शैक्षणीक, आरोग्य अशा सर्वच क्षेत्रात जाणवला. आज सलग 5 तास विद्युतपुरवठा बंद असल्यामुळे अनेकांची कामे खोळंबली. दैनंदीन व्यवहार विस्कळीत झाले. आज ऊन्हाचा पारा सुध्दा खुपच चढलेला होता त्यात वीज गायब झाल्याने आजारी रुग्ण, वयोवृध्द नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला.  याला जबाबदार कोण? असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.


महावितरण च्या अधिकार्‍यांकडून याचे समाधानकारक उत्तर मिळणे अपेक्षीत होते मात्र तसे घडले नाही. यापुढे तरी कोणतीही पुर्वसुचना नागरिकांना न देता पाच-पाच तास विद्युत पुरवठा बंद करु नये एवढीच नागरिकांची माफक अपेक्षा आहे.

पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...






 




 


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com   livepandharpur@gmail.com

  आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 18 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 55 हजार 165  च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 4 हजार 067 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Post a Comment

0 Comments