पंढरपूर लाईव्ह
पंढरपूर 17 : जीवनदायी रक्तदानाची प्रत्येकालाच गरज आहे. त्यामुळे मातृस्मृतीदिनाचे औचित्य साधून महाशिवरात्रीनिमित्त रक्तदान शिबीर आणि प्रतिवर्षी प्रमाणे उन्हाळ्यानिमित्त नागरिकांची तहान भागविण्याच्या हेतूने सुरू केलेल्या पाणपोईचा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असा आहे, असे प्रतिपादन विनया परिचारक यांनी केले.
रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यास आलेल्या प्रमुख पाहुण्या सौ.विनया परिचारक आणि सौ.सुनिता तोंडे, सौ.आशा दाबक, मनिषा दाबक यांनी उस्फुर्तपणे रक्तदान करून अभिनव आदर्श निर्माण केला.येथील रेल्वे स्टेशन परिसरातील राजयोगिनी अहिल्यादेवी होळकर मागास महिला चॅरिटेबल ट्रस्ट, विठाई महिला बचत गट आणि दयावान युवक बचत गट यांचे वतीने प्रतिवर्षाप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त तसेच संस्थेच्या प्रमुख
माजी नगरसेविका कमलताई तांेंडे (येळे) यांच्या मातोश्रींच्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ मंगळवारी रक्तदान शिबिराचे आणि उन्हाळ्यानिमित्त पाणपोईचे उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी सौ.परिचारक बोलत होत्या.
सौ.परिचारक यांच्या हस्ते गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन झाला. यावेळी डॉ.सूरज रूपनर व डॉ.अश्विनी परदेशी यांचा गौरवपत्र देवून सन्मान करणेत आला. रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ.सूरज रूपनर यांचे शुभहस्ते व नगराध्यक्षा सौ.साधना नागेश भोसले यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडले. पाणपोईचे उद2घाटन उमेश परिचारक यांनी केले. डॉ.रूपनर व उमेश परिचारक या उपस्थित मान्यवरांनी वर्षभर सर्वसामान्यांना केंद्रस्थानी मानून राबवण्यात येणार्या विविध लोकपयोगी उपक्रमांविषयी संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमास इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा मंजूषा वाघ, अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष रा.पां.कटेकर, ज्येष्ठ इतिहास संशोधक गोपाळराव देशमुख, मिलींद वाघ, सुरेखा रूपनर, सौ.ज्योती कटेकर, श्री व सौ.डॉ.शैलजा
देवकते, डॉ.आशालता कारंडे, सुनिता पडळकर, जयश्री कर्हाडे, शंकरराव काळे, सुधाकर बंदपट्टे, जितेंद्र बनसोडे, प्रमोद जाधव, अशोक घोडके, तम्मा घोडके, कांतीलाल वरपे, धोंडिराम सलगर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक पंकज तोंडे व सहकारी यांनी सदर कार्यक्रम यशस्वी होणेसाठी परिश्रम
घेतले. सुत्रसंचालन डॉ.संगीता पाटील व नंदकुमार कुलकर्णीसर यांनी केले.
पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...














0 Comments