वैरण विकास योजनेअंतर्गत बियाणे उपलब्ध

पंढरपूर लाईव्ह:-

पंढरपूर-दि.12:- जनावरांना पोषक आणि सकस चारा मिळावा यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत गतिमान वैरण विकास योजना कृषी विभागामार्फत राबवण्यात येत असून या योजनेअंतर्गत तालुक्यातील गरजू शेतक-यांना जनावरांसाठी कडवळाची लागवड करण्याकरीता बियाणे उपलब्ध असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी एम.पी.जगताप यांनी दिली.

 या योजनेतून सन 2014-15 साठी पंढरपूर तालुक्यास मालदांडी (35-1)ज्वारी पिकाचे 100 क्विंटल बियाणे प्राप्त झाले होते. त्यापैकी 83 क्विंटल बियाणाचे वाटप झाले असून, 17 क्विंटल बियाणे शिल्‍लक आहे. प्रती किलो बियाण्यासाठी 14.50 रुपये इतका लोकवाटा आहे. या बियाण्यासाठी गरजू शेतक-यांनी मंडळ कृषी अधिकारी तुंगत यांच्याशी संपर्क साधावा असे अवाहनही तालुका कृषी अधिकारी श्री.जगताप यांनी केले आहे.
 0000

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

 


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com   livepandharpur@gmail.com

  आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 14 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 53 हजार 449  च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 3 हजार 889 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Post a Comment

0 Comments