पंढरपूर लाईव्ह:-
मुंबई दि.12: कामगार कायदा अधिक सक्षम करण्यासंदर्भात राज्यात कायमस्वरूपी त्रिपक्षीय समिती गठीत करण्यात येईल असे कामगार मंत्री प्रकाश महेता यांनी काल संघटीत व असंघटीत कामगारांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी श्री महेता यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कामगार विभागाचे सचिव बलदेव सिंह,आयुक्त एच.के. जावळे, कामगार विभागाचे अधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
विविध संघटनांनी राज्यातील कामगारांना भेडसावणा-या विविध समस्या श्री महेता यांच्यासमोर मांडल्या असता ते म्हणाले की, राज्यात कामगारांसाठी त्रिपक्षीय समिती स्थापन केल्यास कामगारांचे प्रश्न जलद गतीने सोडविण्यास सहकार्य लाभेल. या त्रिपक्षीय समितीत कामगार , मालक आणि प्रशासकीय अधिका-यांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. तसेच या विभागाच्या समित्यांचे नव्याने पुनर्गठन करताना व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात येईल.कामगारांना किमान वेतन मिळावे यासाठी अंमलबजावणी करण्यात येणार असून, त्यासंदर्भातील अहवाल संबंधित अधिका-यांनी सादर करावा तसेच असंघटीत कामगारांमधील प्रामुख्याने नाका कामगारांची नोंदणी करण्यासाठीची योजना, स्मार्ट कार्ड योजना इत्यादी योजना राबविण्यात येणार असल्याचे कामगार मंत्र्यांनी सांगितले.श्री महेता म्हणाले की, नागपूर येथील बगडगंज, पाचपावली आणि सोमवारी क्वार्टर्स येथे राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत कामगारांसाठी प्रथोमोपचार केंद्र सुरू करण्याची कार्यवाही तसेच या आरोग्य केंद्रात कर्मचारी आणि रूग्णांना लागणा-या सर्व सुविधा पुण्यातील जबिल सर्कीट इंडीया प्रा. लिमीटेड या कंपनीत कंत्राटी कामगार व कायमस्वरूपी कामगार यांचे प्रमाण 60/40 असे करण्यात यावे तसेच महिला कर्मचा-यांच्या सुरक्षेची संपूर्ण् जबाबदारी कंपनीने घेऊन त्यांच्या कामाच्या वेळा ठरविण्यात याव्यात. अशा सुचनाही श्री महेता यांनी बैठकीदरम्यान कंपनीच्या संबंधित अधिका-यांना केल्या आहेत.


0 Comments