पंढरपूर लाईव्ह:-
मुंबई, दि.12: महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण आहे. दावोस येथे झालेल्या जागतिक परिषदेत त्याची प्रचिती आली असून मेक इन इंडीया च्या धर्तीवर मेक इन महाराष्ट्र अशी वाटचाल सुरू झाली आहे. राज्य शासनाने इज ऑफ डुईंग बिझीनेसवर लक्ष केंद्रीत करण्याबरोबरच उद्योगांना पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्यात येत असून भिवंडीजवळ लॅाजिस्टिक हब उभारण्यात येईल,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
हॉटेल ट्रायडन्ट येथे सकाळी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ण्ड इंडस्ट्री (फिक्की) यांच्यातर्फे ॠप्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र 2015 परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. परिषदेला उद्योमंत्री सुभाष देसाई, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुषण गगराणी, सिकॉमचे व्यवस्थापकीय संचालक अशिषकुमार सिंग, फिक्कीच्या अध्यक्षा डॉ.ज्योस्त्ना सुरी, राज्यातील उद्योजक आदी उपस्थितीत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, दावोस येथील परिषदेत भारतात गुंतवणुकीसाठी पोषक असे वातावरण दिसून आले. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणुक करण्यासाठी तयारी दर्शविली आहे. जास्तीत जास्त औद्योगिक गुंतवणुक राज्यात होण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून महत्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. परवानग्यांची संख्या कमी करण्याबरोबरच ई पोर्टलचा वापरही करण्यावर भर दिला जात आहे. राज्यात कुशल मनुष्यबळाची उपलब्धता करण्याबरोबरच उद्योगांना पायाभूत सुविधांची उभारणी करण्यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले.
राज्य शासनाने सुरू केलेले आपले सरकार हे वेब पोर्टल सध्या मंत्रालयस्तरावरील असून
त्यावर जनतेच्या तक्रारी, सूचना, अभिप्रायांची नोंद घेतली जात आहे. आतापुढील टप्प्यात तहसील स्तरावरील तक्रारी देखील ह्या वेब पोर्टलवर दाखल करण्यात येतील, अशी सुविधा निर्माण केली जाणार आहे. नागरिकांना विशिष्ट कालमर्यादेत सेवा देण्यासाठी सेवा हमी विधेयक लवकरच आणत आहोत. त्यासाठी या विधेयकाचा मसुदा जनमतासाठी ठेवण्यात आला आहे. नवी मुंबई विमानतळाच्या विकासाला गती देण्यासाठीही राज्य शासन प्रयत्नशील आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी उद्योजकांनी मुख्यमंत्र्यांबरोबर राज्यातील औद्योगिक गुंतवणुकी संदर्भात सविस्तर चर्चा केली. उद्योगवाढीसाठी घेण्यात येणार्या विविध उपाययोजनांची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी उद्योजकांना दिली.

0 Comments