शैक्षणिक वर्षातील दिनविशेष दिवसांची संख्या कमी करण्याचा विचार - विनोद तावडे मुख्याध्यापक दिवस साजरा

पंढरपूर लाईव्ह:-

मुंबई दि.12: शैक्षणिक वर्षामध्ये वर्षातील 52 दिवस हे दिनविशेष दिवस म्हणून साजरा करण्यात येतात. या दिवसांमध्ये होणा-या परिपाठामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे दिवस वाया जातात असे निदर्शनास आले आहे, त्यामुळे भविष्यात हे दिवस कमी करुन या दिवसांची रचनात्मक मांडणी करण्याचा शालेय शिक्षण विभाग विचार करीत आहे, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज सांगितले.

कोकुयो-कॅम्लिनच्या वतीने आज प्रथमच मुख्याध्यापक दिवस (प्रिन्सिपल-डे) शिक्षण मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. देशभरातील मुख्याध्यापकांना प्रणाम  करण्याकरिता आज या विशेष दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. अंध विद्यार्थ्यांसाठी लेखनिक देण्याबाबत मुभा दहावी आणि बारावीच्या परिक्षेला बसणा-या दृष्टीहिन विद्यार्थ्यांना लेखनिक देण्याची मुभा आहे, 10 वीच्या विदयार्थ्यांना 9 वीचा आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना 11 वीचा विद्यार्थी लेखनिक म्हणून घेण्याची सुविधा आहे, परंतु सध्या लेखनिक उपलब्ध होत नाही, कारण इयत्ता 9 वी आणि 11 वीचे  विद्यार्थी स्वतच्या अभ्यासात व्यग्र असतात त्यामुळे ही अट शिथिल करण्याचा विभागाचा विचार आहे, त्यामुळे महाराष्ट्रात किमान 1500 प्रामाणिक व्यक्ती शोधण्यात याव्यात, या प्रामाणिक व्यक्ती विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रश्नपत्रिका लिहतील. अशा प्रामाणिक व्यक्तींचा एक संच स्थापन करण्याचा शालेय
शिक्षण विभाग विचार करीत आहेत. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्यामार्फत ही कार्यवाही करण्यात येईल असेही श्री. तावडे यांनी स्पष्ट केले.

मुख्याध्यापक हे शिक्षण व्यवस्थेमधील कर्णधाराची भूमिका बजावत असतात. शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना योग्य दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य मुख्याध्यापक करीत असतात, त्यामुळे मुख्याध्यापकांनी प्रशासकीय कामाएवजी शिक्षणाचे कामाकडे जास्तीत लक्ष द्यावी अशी अपेक्षा श्री.तावडे यांनी यावेळी व्यक्त केली.शासकीय शाळांमधील दृष्टीहीन विद्यार्थ्यांना नियमित विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम शिकविण्याएवजी त्यांना अंध शाळांधील अभ्यासक्रम ब्रेल लिपीमध्ये देण्यात यावा असा आमच्या विभागाचा मानस आहे, त्यामुळे नॅब सारख्या संस्थांशी चर्चा करुन त्या विद्यार्थ्यांना सुलभ होईल असा अभ्यासक्रम देण्याचा विचार विभागाच्या वतीने करण्यात येईल असेही श्री. तावडे यांनी स्पष्ट केले.

यावर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या चार मुख्याध्यापकांचा श्री. तावडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक दिवसानिमित्त विविध ठिकाणाहून उपस्थित मुख्याध्यापकांना यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याशी संवाद साधला. मुख्याध्यापकांना विचारलेल्या प्रश्नांना श्री.तावडे यांनी दिलेल्या उत्तरामुळे मुख्याध्यापकांचे समाधान झाले.या प्रसंगी कॅम्लिनचे उपाध्यक्ष श्रीराम दांडेकर, मुंबई जॅपनीज स्कुलचे मुख्याध्यापक तोमोआकी     नेमोतो, आदी मान्यवर उपस्थित होते.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

 


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com   livepandharpur@gmail.com

  आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 14 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 53 हजार 449  च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 3 हजार 889 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Post a Comment

0 Comments