पंढरपूर लाईव्ह:-
दि. 12 फेब्रुवारी, 2015
मुंबई, दि. 12: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा आणि महाराष्ट्राचा सर्वंकष विकास साधण्यासाठी मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र बनविणार असून बीकेसी प्रकल्पासारखे आणखी पाच प्रकल्प उभारणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.
हॉटेल पॅलेडीयन येथे इडेलवाइस इंडिया परिषद 2015 चे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. देशाच्या विकासात्मक दृष्टीने मेक इन इंडिया ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मेक इन महाराष्ट्र या संकल्पनेतून महाराष्ट्राचा विकास साधण्याचे शासनाचे उद्दीष्ट आहे. मुंबईत नवनवीन उद्योग उभारण्यास संधी मिळावी यासाठी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्ससारखे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.मुंबईत इमारती व उद्योग उभारण्यासाठी परवान्यांची आवश्यकता असते. मुंबईतील वाढत्या लोकसंख्येमुळे नागरीकांना त्यासाठी योग्य जागा उपलब्ध होत नाहीत. नागरीकांना ती जागा उपलब्ध करुन देण्याचे शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. असेही मुंख्यमंत्री यांनी सांगितले.
याप्रसंगी मुंबईहून नवी मुंबईस जाण्यासाठी प्रवाशाना होणार्या अडचणी लक्षात घेता त्यासाठी मुंबई व नवी मुंबई जोडण्यासाठी ट्रान्स हार्बर लिन्कचे निर्माण करण्याची शासनाची नवीन कल्पना आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.


0 Comments