पंढरपूर लाईव्ह:-
दि. 12 फेब्रुवारी, 2015
मुंबई, दि. 12 : मध्यावधी बदल्या करतांना बदली कायद्यातील तरतुदींचे व्यवस्थीत पालन करावे असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. एखाद्या प्रकरणात तीन वर्षापेक्षा कमी कालावधी असलेल्या कर्मचार्याच्या विरोधात गैरवर्तणूकीची तक्रार असल्यास आणि तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्यास संबंधित कर्मचार्याला त्याच पदावर ठेवून त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरु करण्याचा निर्णय घ्यावा. मात्र त्या कर्मचार्याला या पदावर ठेवणे योग्य नाही असे जर प्राधिकार्याचे मत झाल्यास त्याबाबतची योग्य कारणीमिमांसा करुन त्याची बदली वरिष्ठ अधिकार्याकडे अशा बदल्या करतांना काही वेळा गैरवर्तणूकीचे कारण किंवा अपरिहार्य परिस्थिती असे कारण दाखवून बदली केली जाते. मात्र या बदलीची खरोखरच आवश्यकता आहे का ही बाब तपासली जात नाही. त्यामुळे आता शासनाने खालील प्रमाणे मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.
तीन वर्षाचा कालावधी पूर्ण केल्याखेरीज संबंधित अधिकारी किंवा कर्मचार्याची
बदली प्रस्तावित करु नये. अशा बदल्या वर्षातून केवळ एप्रिल व मे महिन्यामध्येच कराव्यात.
तीन वर्षाचा कालावधी पूर्ण नसलेल्या कर्मचार्याची बदली करावयाची असल्यास विशिष्ट कारण नमुद करणे आणि आपल्या वरिष्ठ अधिकार्याची सहमती घेणे आवश्यक आहे.
एखाद्या कर्मचार्याने विशिष्ट पदाची मागणी केल्यास किंवा त्याने लोकप्रतिनीधीमार्फत ते पद मागितल्यास या विशिष्ट पदावर काम करणारा कर्मचारी जर तीन वर्षापेक्षा कमी काळ या पदावर असेल तर त्याची बदली करु नये. हे पद मागणार्या कर्मचार्याची पदस्थापना लोकप्रतिनीधीमार्फत एखाद्या विशिष्ट पदाच्या मागणी करण्याकरिता बदली प्राधिकार्यावर दबाव टाकण्यात येत असल्यास संबंधित कर्मचार्याच्या विरोधात आवश्यकतेप्रमाणे शिस्तभंगाची कारवाई करावी. सर्व प्रशासकीय विभागाने पदस्थापना आणि बदल्यांच्या बाबतीत मागणी सेवा
000


0 Comments