पंढरपूर लाईव्ह (गोपीनाथ देशमुख यांजकडून):- करकंब ता. पंढरपूर येथे दि. 19 फेब्रुवारी 2015 रोजी करकंब ग्रामपंचायतीच्या वतीने शिवजन्मोत्सवानिमित्त शिवप्रतिमेचे पुजन करुन छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली. करकंब ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. रोहिणी वंजारी, नागेश वंजारी, उपसरपंच आदिनाथ देशमुख यांचे हस्ते शिवप्रतिमेचे पुजन करण्यात आले.
यावेळी प्रदिप खंकाळ, विजय मस्के, दत्ता यंपे, विशाल देशमुख व ग्रामसेवक एस.एम. यादव तसेच करकंब परिसरातील अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.
थोरली वेस येथे भव्य शिवमुर्तीचे पुजन युनियन बँकेचे मोडनिंब शाखा मॅनेजर प्रसाद शेटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांचा सत्कार भागवत पलंगे यांनी केला. यावेळी शिवप्रतिमेचे दर्शनासाठी बहुसंख्य शिवप्रेमी उपस्थित होते. यावेळी अमोल शेळके, संजय जगताप, अतुल अभंगराव, सुधीर झिरपे, अमर चव्हाण, शिवाजी व्यवहारे, औदुंबर कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
करकंब बसस्थानक येथे ही छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन उपसरपंच श्री. अदिनाथ देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले. सोमवारपेठ, थोरलीवेस, अभिमान नगर, नेमतवाडी चौक याठिकाणीही शिवप्रेमींनी मोठ्या उत्साहात शिवप्रतिमेचे पुजन करुन फटाक्यांची आतिषबाजी केली.
पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...

















0 Comments