पंढरीत शिवजयंती निमित्त अनेक कार्यक्रम युवक मराठा महासंघ व युवा गर्जना ग्रुप कडून आयोजन

पंढरीत शिवजयंती निमित्त अनेक कार्यक्रम

युवक मराठा महासंघ व युवा गर्जना ग्रुप कडून आयोजन

पंढरपूर लाईव्ह (श्रीराम आतकरे यांजकडून):-   

पंढरपूर येथे शिवजयंती च्या निमित्ताने अनेक कार्यक्रम होणार असून या सर्व कार्यक्रमांचे आयोजन येथील युवक मराठा महासंघ व युवा गर्जना ग्रुप यांचेकडून केले आहे. युवक मराठा महासंघाच्या वतीने आज दि. 19-2-2015 रोजी सकाळी 9:30 वाजता भव्य मिरवणूक निघणार असून यानंतर छत्रपती शिवरायांच्या मुर्तीचे पुजन करण्यात येणार आहे. यावेळी महासंघाच्या वतीने शिवजयंती चे हे प्रथम वर्ष असून शिवप्रेमींच्या उत्साहाला उधान आलेले आहे. 


यासाठी युवक मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष सुमित शिंदे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. त्यांनी स्वत: यासाठी बहुमोल योगदान दिलेले आहे. ही शिवजयंती लोकवर्गणीतून न करता त्यांनी स्वत: यासाठीच्या सर्व खर्चासाठी निधी दिला आहे.

आज सायंकाळी 5 वाजता पंढरपूर येथे मंदिर परिसर, नामदेव पायरी परिसरातून भव्य मिरवणुक निघणार असून त्यामध्ये मोठ्या संख्येने शिवभक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष सुमित शिंदे यांनी केले आहे. यासाठी सचिन अभंगराव, सुनिल शिंदे, अमित पाठक, संतोष डोंबे, चेतन सावंत, अणिजित बेळगावकर, पप्पू काळे, ओंकार पवार, किरण कोळी, अप्पा मस्के, अरविंद शिंदे आदी परिश्रम घेत आहेत. 

पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...






 








 


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com   livepandharpur@gmail.com

  आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 19 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 55 हजार 512  च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 4 हजार 122 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Post a Comment

0 Comments