पंढरपूर लाईव्ह (दि.25 फेब्रुवारी 2015):-
विविध सामाजिक संघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, प्रशासन वारकरी, पत्रकार व
पंढरीतील नागरिकांच्या सहकार्याने व सल्ल्याने पंढरीतील स्वच्छतेचा व
शौचालयाचा प्रश्न युध्द पातळीवर सोडविणार असल्याची माहिती एस. चोकलिंगम
(विभागीय आयुक्त पुणे) यांनी पत्रकारांना दिली. उच्च न्यायालयाने दिलेल्या
आदेशानुसार आपण सर्व ठिकाणी जाऊन स्वच्छतेचा व शौचालयाचा आढावा घेत आहोत.
असे विचार त्यांनी व्यक्त केले. त्याचाच भाग म्हणून आज पंढरपूर मधील
विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हाधिकारी
तुकाराम मुंढे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी, पंढरपूरचे
तहसिलदार गजानन गुरव, पंढरपूर न.प. चे मुख्याधिकारी शंकर गोरे व पंढरीतील
अनेक पत्रकार उपस्थित होते.
यावेळी
विविध प्रश्नावर त्यांनी पत्रकारांना उत्तरे दिली. तसेच पत्रकारांकडून
चंद्रभागा पात्राच्या प्रदुषणाबाबत आणि यात्रा कालावधीमध्ये शौचालयाच्या
प्रश्नावर कांही उपाययोजना आखुन नदीपात्र व पंढरपूर शहरात निर्माण होणारी
अस्वच्छतेची गंभीर समस्या सोडविण्यास सर्व ते प्रयत्न करता येतील का? यावेळी कांही पत्रकारांनीही आपली मते पुढीलप्रमाणे मांडली. ‘‘या परिसरातील साखर कारखाने मोठमोठमोठ्या संस्था, औद्योगीक कारखाने, बँका यांनीही पंढरपूरमधील नागरिकांच्या आरोग्याचा आणि स्वच्छतेचा प्रश्न गांभीर्याने घेवून शौचालया संदर्भात सहकर्याची भुमीका घेणे आवश्यक आहे.’’ ‘‘पुण्यातील मोठ मोठ्या कंपन्यांनी आळंदी ते पंढरपूर व देहू ते पंढरपूर या पालखी सोहळ्यामध्ये वारकर्यांना पंढरपूर स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक ते प्रबोधन करण्यासाठी पत्रके वाटावीत, मोबाईल वर संदेश द्यावेत, व्हिडीओ क्लिपजच्या माध्यमातून व सोशल नेटवर्क च्या माध्यमातून जनजागृती करणेसाठी आपले योगदान द्यावे.’’ ‘‘रेल्वेने दररोज 15 ते 20 हजार वारकरी पंढरपूरमध्ये येत असतात. परंतु त्यांच्या साठी शौचालयाची सोय मात्र रेल्वे प्रशासनाने केलेली नाही हा संपुर्ण भार पंढरपूर नगरपरिषदेवर येवून पडतो. तरी रेल्वे प्रशासनानेही आपल्या जागेत कांही शौचालय बांधावीत.’’ ‘‘यात्रा कालावधीमध्ये सांगोला रोड दाते मंगल कार्यालयाजवळ, नदीपलीकडे आढीव चौकात तसेच चंद्रभागा मैदान येथे हंगामी बसस्थानक केल्याने तेथे उतरणार्या वारकर्यांचे पंढरपूरकडे जाण्यासाठी खुप हाल होतात. यामध्ये वृध्द, महिला, लहान मुले यांचाही समावेश असतो. यावेळी रिक्षावाले मनमानी पध्दतीने भाडे आकारतात. अशा वेळी वारकर्यांची सोय व्हावी म्हणून हंगामी बसस्थानकापासून पंढरपूर स्थानकापर्यंत मिनी बससेवा सुरु करावी.’’ ‘‘पत्रकारांनी दिलेल्या सर्व सुचनांच्या नोंदी केलेल्या असून वरील सर्व सुचनांचा विचार करुन यावर लवकरंच काम सुरु करु’’ अशी ग्वाही यावेळी पुणे विभागीय आयुक्त श्री. एस. चोकलिंगम यांनी दिली.
यावेळी पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे, जोशाबा टाईम्स् चे संपादक श्रीकांत कसबे, पंढरपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे, दिपक होमकर, पत्रकार संजय वाईकर, प्रविण नागणे, विकास पवार, महेश खिस्ते, अतुल बडवे, गणेश क्षिरसागर, सचिन कांबळे, नितीन शिंदे, संतोष कुलकर्णी, महेश भंडारकवठेकर, सुनील शिवशरण, विनायक हरिदास, माऊली डांगे, शाम दिवेकर व उप माहिती कार्यालयातील श्री. गरगडे व प्रेस फोटोग्राफर उमेश टोमके आदी उपस्थित होते.
प्रबोधन करणे गरजेचे आहे. यासाठी नगरसेवक, वारकरी, पत्रकार, यांनी अग्रेसर भुमीका घेणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. पंढरपूरात कायमस्वरुपी शौचालय बांधल्यास त्याचा मेंटनन्स कसा भागवायचा? व वारी सोडून इतर वेळी त्याचा काय उपयोग काय? याबाबतही आपण सल्ला द्यावा अशी आग्रही भुमीका आयुक्तांनी मांडली.
पंढरपूर पत्रकार संघाच्या वतीने विभागीय आयुक्तांना निवेदन
पंढरपूर लाईव्ह (दि.25 फेब्रुवारी 2015):- पंढरपूरमधील पत्रकार भवनासाठी मंजूर असलेल्या 4 गुंठे जागेचा ताबा अथवा बांधकाम करुन मिळावे या मागणीचे निवेदन आज पुणे चे विभागीय आयुक्त श्री. एस. चोकलिंगम यांना देण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिभाऊ
प्रक्षाळे,
प्रविण नागणे, विकास पवार, पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे,
जोशाबा टाईम्स् चे संपादक श्रीकांत कसबे, पंढरपूर दिपक होमकर, पत्रकार
संजय वाईकर, महेश खिस्ते, अतुल बडवे, गणेश क्षिरसागर, सचिन कांबळे, नितीन
शिंदे, संतोष कुलकर्णी, महेश भंडारकवठेकर, सुनील शिवशरण, विनायक हरिदास,
माऊली डांगे, शाम दिवेकर व उप माहिती कार्यालयातील श्री. गरगडे आदी उपस्थित
होते.
****
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. दि. 25 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 61 हजार 402 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 4 हजार 812
च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत
असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात
अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 25 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 61 हजार 402 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 4 हजार 812 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...

















0 Comments