पंढरपूर लाईव्ह (दि.24 फेब्रुवारी 2015):-
पंढरीतील रस्ते अपघात रोखण्यासाठी...
विशेष लेख:- भगवान वानखेडे
पंढरपूरमधील कर्मवीर भाऊराव पाटील चौकात लहान-मोठ्या अपघातांचे सत्र चालुच असून दि. 21 फेब्रुवारी 2015 रोजी असाच पण अतिशय भीषण असा अपघात झाला आणि दोघा निष्पाप तरुणांचे बळी गेले. यावेळी अपघात ठिकाणचे दृश्य मन सुन्न करणारे होते. ‘पंढरपूर लाईव्ह’ ने सर्वप्रथम या अपघाताची इत्यंभुत सविस्तर बातमी सर्वप्रथम प्रसिध्द केली. यापूर्वीही ‘पंढरपूर लाईव्ह’ ने याठिकाणी घडलेल्या कांही अपघाताबाबतच्या बातम्या प्रसिध्द केलेल्या आहेत. याबरोबरच दि. 8 जानेवारी 2015 रोजी याच ठिकाणी शेळवे (ता.पंढरपूर) येथील एक ग्रामस्थ बालंबाल बचावल्याची बातमी प्रसिध्द केली तेंव्हा येथील अपघातांचे दुर्दैवी सत्र थांबवण्यासाठी कोण-कोणत्या उपाययोजना राबवणे आवश्यक आहेत याबाबत पंढरपूरकरांचे मत व्यक्त केले होते. दि. 21 फेब्रुवारी 2015 रोजी येथेच पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या टँकरने समोरुन येणार्या दुचाकी ला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील दोघांचाही करुण अंत झाला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून आवश्यक ती मदत केली. या अपघातातील आरोपी टँकर चालक अखिलेश राजेंद्रकुमार यादव, रा. जि. बदलापूर (उत्तरप्रदेश) याला ताब्यात घेतले. मात्र के.बी.पी. चौकात वारंवार घडणार्या या अपघातांच्या घटना टाळण्यासाठी कराव्या लागणार्या अत्यावश्यक उपाययोजना करण्यास स्थानिक नेते, प्रशासकीय यंत्रणा यांचेकडून अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. का होतात इथे असे अपघात..? वारंवार अपघातात बळी पडणार्यांच्या मृत्यूस कारणीभुत कोण...? काय करायला हवे येथील अपघात टाळण्यासाठी..? काय म्हणतात पंढरपूरचे नागरिक...? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा ‘पंढरपूर लाईव्ह’ चा हा प्रयत्न. 21 फेब्रुवारीची अपघात घडलेली बातमी पंढरपूर लाईव्ह ने प्रसिध्द करताच आम्हास फेसबुक आणि इतर सोशल नेटवर्कच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष संपर्क साधून बर्याच नागरिकांनी आपल्या ‘तीव्र’ प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यातील कांही निवडक प्रतिक्रिया सुध्दा प्रसिध्द करत आहोत.
पंढरपूरमधील के.बी.पी. चौक प्रवासासाठी खतरनाक बनलेला असून येथे कायमस्वरुपी वहातुक पोलिसांची नेमणुक, सरगम चौक ते विसावा मंदिर पर्यंत रस्ता दुभाजक, व ट्रॅफिक सिग्नल ची अत्यावश्यकता आहे. आकारमानाने हा चौक लहान असल्याने वाहतुकीची कोंडी ही नेहमीची बाब. या चौकातून होते मोठी रहदारी.... भरधाव वेगाने येणार्या अवजड वाहनांचा राबता याच चौकातून.... चौकातील चबुतरा असून अडचण नसून खोळंबा... या चौकानजीक असणार्या के.बी.पी. पाटील कॉलेज समोर गतीरोधक बसवले होते. मात्र हे गतीरोधक गायब झालेले आहेत. त्यामुळे भरधाव वेगात धावणार्या वाहनांना इथे ‘ब्रेक’ लागत नाही... ब्रेक बसतोय तो सर्वसामान्यांच्या काळजाला... कधी कुठून कोणते वाहन येवून आपणास धडकेल या भीतीने या चौकातून महिला व वयोवृध्द नागरीक तसेच विद्यार्थी जीव मुठीत धरुन प्रवास करत असतात. या चौकातून नविन पुलाकडे जाण्यासाठी बायपास रस्ता आहे मात्र अनेक ट्रक व टिपर चालक या बायपास रस्त्यावरुन न जाता पंढरपूर शहरातून भरधाव वेगात जातात. यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होते. पुण्याच्या दिशेकडून येणारी... कोल्हापूर सातार्याकडून येणारी अवजड वाहतुक येथूनच भरधाव वेगात होते. जवळच कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, यशवंत विद्यालय, इंग्लिश मिडीयम स्कुल, राजाराम इंग्लिश मिडीयम स्कुल, कवठेकर प्रशाला आदी शैक्षणीक संस्था आहेत. त्यामुळे या चौकातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वर्ग प्रवास करत असतात. म्हणूनच या चौकातील वाहतुकीला शिस्त लावणे अत्यावश्यक आहे. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत अनेक युवक भरधाव वेगात बाईक्स् पळवताना सर्रास आढळतात... त्यातल्या त्यात शैक्षणिक संस्थांकडे जाणार्या रस्त्यावरील प्रवास म्हणजे सर्वसामान्यांसाठी ‘जीव मुठीत धरुन’ केल्यासारखाच आहे. याला आळा बसण्यासाठी पंढरपूर शहर वाहतुक शाखेच्या वरीष्ठ अधिकार्यांनी लक्ष देवून योग्य त्या उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.
आप्तेष्ठ घरी सुखरुप परत येत नाहीत तोपर्यंत सार्यांचा जीव टांगणीला...
कुणाची मुले शाळेत किंवा कांही कामानिमित्त बाईक अथवा सायकल घेवून गेलेली असतात... काहींचे घरातील वयस्क व्यक्ती कांही कामानिमित्त या चौकातून प्रवास करतात.... अशा एक ना अनेक कारणांनी ज्या ज्या नागरिकांचे आप्तेष्ठ या चौकातून जात-येत असतात तेंव्हा ते घरी सुखरुप परत येईपर्यंत घरातील सर्वांचाच जीव एका अनामिक भीतीमुळे टांगणीला लागलेला असतो. कारण एकच.. के.बी.पी. चौकात वारंवार घडणारे अपघात आणि तेथे अपघातात जात असलेले बळी...!
काय आहेत उपाययोजना...?
पंढरपूरमधील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी, सामाजिक संस्था-संघटनांनी व शासकीय अधिकार्यांनी एकत्रीतपणे पंढरपूरमधील या मोठ्या समस्येकडे एक गंभीर समस्या म्हणून पहावे. या चौकात बांधलेला ‘नारळी चबुतरा’ काढावा. वाहतुक पोलिसांसाठी एखादे सर्व सुविधांनी युक्त असे अत्याधुनिक बुथ असावे. जेणेकरुन येथे कायमस्वरुपी वाहतुक पोलिस थांबतील व वाहतुकीला शिस्त लावतील. विसावा मंदिर (इसबावी) ते सरगम चौक रस्ता दुभाजक हवेत जेणेकरुन कोणीही आडवी तिडवी वहाने चालवणार नाहीत. शक्य तो येथे सिग्नल ची व्यवस्था असावी. अवजड वाहतुक कटाक्षाने बायपास रोडनेच होणेसाठी कडक नियम करावेत. ऊसाची वाहतुक करणार्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर वर वाहन क्रमांकाची सक्ती हवी. तसेच ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ऊस भरताना त्याचे पॅकींग सुव्यस्थीत मजबुत हवे. ऊस ट्रॅक्टर चालक पंढरपूरमध्ये प्रवास करताना तरी मोठ -मोठ्या आवाजात वाजवीली जाणारी कर्कश संगीत-गाणे बंद ठेवतील याकडे वाहतुक पोलिसांनी कटाक्षाने लक्ष द्यावे. वाहतुकीचे नियम मोडणारांना कायद्यात असलेली कठोरात कठोर शिक्षा करावी. प्रशासकीय व्यवस्थेबरोबरच प्रत्येक नागरिकाचेही कांही कर्तव्य आहेत. प्रत्येक नागरिकांनीही सावधानता बाळगून आपल्या अल्पवयीन मुलांकडे मोठ्या बाईक देवू नये. त्यांना वाहतुकीचे नियम पाळण्यास सांगावे. एखाद्या ठिकाणी अपघात झाल्यास बघ्याची भुमीका न बजावता आपणास शक्य असेल ती मदत करावी. तरुण मित्रांनाही एक विनंती आहे की, आपल्या आयुष्याची खरी सुरुवात आत्ता आहे. वेगाच्या नशेत आयुष्याची धुळधाण होणार नाही याची काळजी घ्या. तुम्हाला ज्यांनी मोठ्या कष्टाने व लाडाकोडाने लहानाचे मोठे केले त्या पालकांचा तरी विचार करा.... शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या चौकातून प्रवास करताना एकमेकांशी बोलू नये. आपले पुर्ण लक्ष समोरुन येणार्या, पाठीमागून येणार्या व आपल्या आजुबाजुला असणार्या वाहनांकडे असावे. आपल्या वाहनांची गती अशा ठिकाणी कमी करावी. आपल्यावर जीवापाड प्रेम करणारे आपल्या घरी वाट पहात असतात हे कुणीच विसरु नये....
‘पंढरपूर लाईव्ह’ ला फेसबुक आणि इतर सोशल नेटवर्कच्या माध्यमातून व प्रत्यक्ष संपर्क साधून बर्याच नागरिकांनी वारंवार होणार्या येथील अपघाताबाबत आपली मते व्यक्त केली. यातील काहींनी सुचना केल्या तर काहींनी प्रशासनावरचा आपला राग व्यक्त केला. काहिंनी अपघातात बळी गेलेल्यांच्या बद्दल हळहळ व्यक्त केली. बर्याच प्रतिक्रिया आलेल्या आहेत. पैकी कांही मोजक्या प्रतिक्रिया जशाच्या तशा पुढे प्रसिध्द करत आहोत.
काय म्हणतात ‘पंढरपूर लाईव्ह’ चे वाचक...?
राजश्री लोंढे:- मागील वर्षी विसाव्या जवळ आमचा अपघात झाला होता तेंव्हाच मी म्हणाले होते की, सरगम चौक ते वाखरी पर्यंत डिव्हायडर (रस्ता दुभाजक) केला पाहिजे. पण इथे कोणाला त्याची पर्वा आहे..? आणखी किती जीव जाणार देव जाणे...!
गौरी अंमळनेरकर:- अपघात झाल्यास सर्वांनी मदत करणे अपेक्षीत आहे.
प्रसाद बडवे:- पंढरपूरात सिग्नल ची खुप गरज असताना पोलिस प्रशासन गप्प का..? माहित नाही...
बाळ कुंभार (आर्किटेक्ट):- या चौकात कायमस्वरुपी एकेरी वाहतुक व्यवस्था असणे अत्यावश्यक आहे. आपण ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या माध्यमातून प्रयत्न करा... जागृती करा... कोणत्याही परिस्थितीत येथे एकेरी वाहतुक तात्काळ करणे गरजेचे आहे. गरज पडल्यास आम्हाला सांगा आपणास यासाठी पाहिजे ती मदत आम्ही करु.
राहुल शिंदे:- तिथे स्पीड ब्रेकर ची गरज आहे.
धनंजय गवळी:- खुप वाईट घडले.
रवी आहेर:- कॉलेज चौक ते सरगम चौक डिव्हायडर (रस्ता दुभाजक) तात्काळ केले पाहिजेत.
रितेश सौंदणे:- गाडी सावकाश चालवा... अपघात टाळा... आपल्या घरी कोणीतरी आपली वाट बघतय... लक्षात ठेवा...
सोनु कोळी:- कॉलेज चौकामध्ये डिव्हायडर (रस्ता दुभाजक) आणि सिग्नलची गरज आहे. आणि सकाळी 9 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत वाहतुक पोलिस पाहिजेत. जेणेकरुन बेफाम पणे वाहने चालविणार्यांना जरब बसेल.
अभिषेक गावडे:- पंढरपूरमध्ये ड्रायव्हिंग पण रॅस झालेय... असलेले सिग्नल चालु नाहीत.
अभंगराव श्रेयस:- व्यूई डॅम नीड ऑफ सिग्नल रियली होल.
पुजा जाधव:- राजकारण्यांना कळाले पाहिजे... त्यांना अद्दल घडली पाहिजे...
संदीप वांजळे:- निष्क्रीय यंत्रणेचे बळी.
इब्राहीम नाईकवाडी:- सरकारी यंत्रणा व पोलिस थोडे कार्यक्षम झाले की, अॅक्सीडेंट कमी होतील.
वासीम तांबोळी:- जड वाहनांना गावात प्रवेश बंद केला पाहिजे.
ॠषिकेश गडकर:- बायपास रोड लवकर व्हावा.
भुषण नागणे:- ट्रॅफिक सिग्नल लवकर लावावेत.
योगेश लालबेगी:- दोन निष्पापांचा मृत्यु हळहळ करणारा.
संदीप उगले:- ऑन दि स्पॉट टू बॉय...
महेश मोटे:- ट्रॅफिक पोलिस तत्पर असते तर दोघांचे प्राण वाचले असते.... कधी सुधारणार पोलिस यंत्रणा देव जाणे... ‘‘बघ रे पांडुरंगा... काय चाललेय तुझ्या पंढरीत.’’
निलेश गंगथडे-पाटील:- बरोबर आहे महेश... ट्रॅफिक पोलिस तत्पर हवेत...
नितीन जवंजाळ:- मोठी वाहने वायपास ने जात नाहीत... गावातून जाताना ऊस वाहतुक करणारे ट्रॅक्टर चालक पण तसेच करतात. ऊसाच्या मोळ्या नीट बांधलेल्या नसतात.
संतोष पुणेकर-सुतार:- क्रांतीसिंह नाना पाटील चौकामध्ये ट्रॅफिक सिग्नलची गरज आहे.
रामेश्वर रंगनाथ ननवरे (महाराज):- पंढरीतील वाहतुक शाखेच्या झोपलेल्या पोलिसांना जागे करण्याची गरज आहे.

********
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. दि. 24 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 60 हजार 341 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 4 हजार 734
च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत
असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात
अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 24 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 60 हजार 341 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 4 हजार 734 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...

0 Comments