बँकांचा बुधवारपासून होणारा संप स्थगीत... लाखो बँक ग्राहकांनी घेतला मोकळा श्‍वास...!

बँकांचा बुधवारपासून होणारा संप स्थगीत...

वेतनवाढीसाठी देशातील बँक कर्मचारी संघटनांनी २५ फेब्रुवारीपासून पुकारलेला ४
दिवसांचा संप स्थगित केला आहे. इंडियन बँक्स असोसिएशनशी (आयबीए) झालेल्या चर्चेनंतर बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी संपाचे हत्यार तूर्त म्यान केले. त्यामुळे लाखो बँक ग्राहकांनी मोकळा श्‍वास घेतला आहे.


याच आठवड्यात अर्थसंकल्प सादर होणार आहे. अशा महत्त्वाच्या घडामोडींच्या काळात बँकांसारख्या वित्तीय संस्था बंद राहणे योग्य नसल्याने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संप मागे घेण्याची विनंती संघटनांना केली होती. 'आयबीए'ने चर्चेसाठी बोलावले असून त्यात आम्ही सहभागी होऊ, अशी माहिती युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचे (यूएफबीयू) राज्य निमंत्रक आणि ऑल इंडिया बँक एम्प्लोईज युनियनचे उपाध्यक्ष विश्वास उटगी यांनी कालच दिली होती. त्यानुसार आज आयबीएशी चर्चा झाल्यानंतर नियोजित संप स्थगित करण्यात आला. याआधी दोनदा अशाचप्रकारे संप मागे घेण्यात आला होता.

गेल्या दीड वर्षांपासून बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा प्रश्न प्रलंबित असून आता आयबीएने १३ टक्के वेतनवाढीची ऑफर संघटनांना दिली असली तरी, २८ सरकारी बँकेतील ८ लाख कर्मचारी १९.५ टक्के वाढीवर ठाम आहेत. १३ टक्के वाढ केली तर बँकांवर वार्षिक ४,०९५ कोटींचा बोजा बसेल. १९.५ टक्के वाढ केली तर १० हजार कोटींचा बोजा सहन करावा लागेल. सरकारी बँकांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने कर्मचाऱ्यांना अपेक्षित वाढ देणे शक्य नसल्याचे आयबीएचे म्हणणे आहे. पाच दिवसांचा आठवड्याची मागणीही आयबीएला मान्य नाही. संघटनांनी सुमारे २३ टक्के तर आयबीएने सुमारे ११ टक्के वाढीचा प्रस्ताव सुरुवातीला ठेवला होता. त्यामुळे सातत्याने चर्चा अपयशी ठरल्या आहेत. 

***********

 


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com   livepandharpur@gmail.com

  आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 23  फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 59 हजार 982 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 4 हजार 686 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...






 








Post a Comment

0 Comments