श्री विठ्ठल इंजिनिअरींग मध्ये कॉम्रेड पानसरे यांना श्रद्धांजली
पंढरपूर लाईव्ह
श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित इंजिनिअरींग कॉलेज मध्ये आज कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांना त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. अवघ्या दोनच वर्षापूर्वी शिवजयंतीच्या निमित्ताने त्यांनी स्वेरीच्या अम्पी थिएटर मध्ये अथांग पसरलेल्या जनसमुदायांसमोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर असे विचार मांडले होते. स्वेरीतील विद्यार्थ्यांनी संकलन करून भरविलेल्या ऐतिहासिक चिकित्सक व संदर्भपूर्ण संग्रहाच्या प्रदर्शनाला त्यांनी आवर्जून भेट देवून विद्यार्थ्यांची पाठ थोपटली होती. त्या’ क्रूर घटनेमुळेच पानसरे यांना अवेळी जगाचा निरोप घ्यावा लागला. यामुळे स्वेरीत आज शोकमयवातावरण होते.
पुरोगामी चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत पानसरे यांनी आयुष्यभर वंचितांसाठी काम केले. त्यांनी आयुष्यभर चळवळीमधील कार्यकर्त्यांना कायमच प्रोत्साहन दिले. समाजातील तळागाळातील जनतेसाठी त्यांनी जो लढा उभारला तो कायम स्मरणात राहील.त्यांच्या पुरोगामी विचारसरणी मुळे कॉम्रेड पानसरे आणि स्वेरी यांच्यात एक नाते तयार झाले होते. कॉम्रेड पानसरे यांच्या निधनाने एका चांगल्या विचारवंताचा अंत झाला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे.’ असे सांगून संस्थापक सचिव व इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी त्यांच्या सहवासातील अनेक आठवणी, घडामोडी सांगितल्या. यावेळी त्यांच्यासह उपस्थित विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले होते. यावेळी अधिष्टाता डॉ. एस.एम मुकणे,डॉ.एम.एम.पाटील, डॉ.श्रीदेवी, प्रा.एस.एम.बागल, वसतिगृह व्यवस्थापक प्रा. एम.एम.पवार,प्रा. यशपाल खेडकर, प्राध्यापक वर्ग,रजिस्ट्रार राजेंद्र झरकर, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
छायाचित्र-कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांना श्री विठ्ठल इंजिनिअरींग मध्ये श्रद्धांजली यावेळी उपस्थित संस्थापक सचिव व इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्यासह, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व विद्यार्थिनी.
***********
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. दि. 23 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 59 हजार 982 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 4 हजार 686
च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत
असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात
अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 23 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 59 हजार 982 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 4 हजार 686 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...

















0 Comments