पंढरपूर लाईव्ह च्या सर्व टीमकडून ‘आबा’ आपणास विनम्रपुर्वक ॥ श्रध्दांजली॥
"निष्ठापुर्वक केलेल्या समाजसेवेचे फलीत म्हणजे आबावर प्रेम करणारे लाखो आबाप्रेमी.."
आबांच्या जाण्याने त्यांचे समर्थक आज पोरके झालेत..
"पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून दिवंगत आर. आर. आबांना काही नेटीझन्सनी शब्दसुमने अर्पण केली" ती जशीच्या तशी...
आबा- सामान्यातील असामान्य कर्तृत्ववान सर्वमान्य नेता
आबांच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा घरची गरीबी होती. गरिबी किती टोकाची होती ती आबांना जवळून अनुभवायला मिळालं...
एकदा आबांचा शर्ट खूप फाटला होता, एकच होता. आबा सकाळी सुईदोरा घेऊन आईकडे गेले व म्हणाले, ''हा कसातरी शिवून दे.''
वैतागलेली आई म्हटली, ''आता कुठं शिवायचं..?''
...म्हटलं घालायचं काय? सहज वर नजर गेली. वडिलांच्या मुत्युनंतर त्यांचे जुने झालेले कपडे एका गाठोड्यात बांधून वर ठेवलेले होते. आईची नजर चुकवून ते सगळे जुने कपडे काढले. वडील जे मृत झाले होते, आणि मृत व्यक्तीचे कपडे वापरत नाहीत. पण, वडिलांचे जुने कपडे घेऊन मी टेलरकडे गेलो. कपडे शिवतानां टेलरने ओळखले की, हे माझ्या वडिलांचे कपडे आहेत... त्रयस्थ, लिंगायत समाजाचा टेलर; पण माझ्या अंगावरचा शर्ट आणि वडिलांचे कपडे बघून त्यांच्याही डोळ्यांमध्ये पाणी आलं...
त्यावेळी अल्टर करुन, ती कापडं घालून मी घरात गेलो... त्यावेळी वडिलांच्या मृत्युनंतरसुध्दा न रडलेली माझी आई त्या दिवशी मला छातीशी धरुन इतकी रडली.. नि मीही भरभरुन रडलो. आयुष्यातील तो दिवस सगळ्यात वाईट दिवस होता. पण, तशाही परिस्थितीत आम्ही शिकलं पाहीजे, ही तिची जिद्द कायमची होती... मी रोजगार हमी योजनेवर शिकत राहिलो... अन आज महाराष्ट्र राज्याचा ग्रहमंञी म्हणून तुमच्या समोर खंबीरपणे उभा आहे...
''कोशिश करनेवालों की कभी हार नही होती''...

"मी कसा घडलो"
(या आर. आर. पाटील यांच्या जीवनचरित्रातून संपादित, साभार) RIP Abba
..आबा..!!
कोपरखळ्या मारत
गाजवायचात सभा..
तुमचं भाषण ऎकायला
उत्सुक होता,महाराष्ट्र उभा..
अर्ध्यावरती डाव सोडून
निघुन गेलात आबा....!!
तुमच्या एका निर्णयानं
पेटल्या घरोघर चुली
बारमध्ये नाचायच्या
बंद झाल्या मुली
या तुमच्या निर्णयानं
सावरले संसार
अन् उगवली मंगलप्रभा
अर्ध्यावरती डाव सोडून
निघुन गेलात आबा....!!
हाती घेतलं तुम्ही
स्वच्छतेचं व्रत
गाडगेबाबांच्या विचारांवर
वाटचाल करत..
फक्त बोलण्यापेक्षा कॄती करत
प्रत्येकाच्या मनावर
घेतला तुम्ही ताबा
अर्ध्यावरती डाव सोडून
निघुन गेलात आबा....!!
तुमच्या रुपानं आदर्श मिळाला
शेतक-यांच्या पोरांना..
भुलला नाहीत तुम्ही कधी
पदे अन् प्रलोभनांना..
त्याचीच पावती म्हणून
हात जोडून आज सारा
महाराष्ट्र उभा...
अर्ध्यावरती डाव सोडून
निघुन गेलात आबा....!!
गाजवायचात सभा..
तुमचं भाषण ऎकायला
उत्सुक होता,महाराष्ट्र उभा..
अर्ध्यावरती डाव सोडून
निघुन गेलात आबा....!!
तुमच्या एका निर्णयानं
पेटल्या घरोघर चुली
बारमध्ये नाचायच्या
बंद झाल्या मुली
या तुमच्या निर्णयानं
सावरले संसार
अन् उगवली मंगलप्रभा
अर्ध्यावरती डाव सोडून
निघुन गेलात आबा....!!
हाती घेतलं तुम्ही
स्वच्छतेचं व्रत
गाडगेबाबांच्या विचारांवर
वाटचाल करत..
फक्त बोलण्यापेक्षा कॄती करत
प्रत्येकाच्या मनावर
घेतला तुम्ही ताबा
अर्ध्यावरती डाव सोडून
निघुन गेलात आबा....!!
तुमच्या रुपानं आदर्श मिळाला
शेतक-यांच्या पोरांना..
भुलला नाहीत तुम्ही कधी
पदे अन् प्रलोभनांना..
त्याचीच पावती म्हणून
हात जोडून आज सारा
महाराष्ट्र उभा...
अर्ध्यावरती डाव सोडून
निघुन गेलात आबा....!!
महाराष्ट्राच्या या जिंदादील आदर्श नेत्याला भावपुर्ण पुष्पांजली
आर.आर.पाटील (आबा) आपल्यात नाहीत.
तोंडाचा कँन्सर होता...तंबाखुच्या व्यसनामुळे कँन्सर झाला होता.आपणासही तंबाखुचे व्यसन असेल तर क्रपया सोडावे...
विनम्रता, उत्तम वक्ता, सामाजिक जाण असलेलं नेतृत्व आणि मोकळं-ढाकळं व्यक्तीमत्त्व आज आपल्यातून गेलं आहे. महाराष्ट्राचे लाडके आबा अर्थात माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचं आज निधन झालं. वयाच्या 57 व्या वर्षी त्यांना काळाने गाठलं.
महाराष्ट्राच्या लाडक्या आबांना कर्करोगाने हरवलं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. इथेच आज त्यांची प्राणज्योत मालवली.

आबांचा परिचय
- रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच आर आर पाटील
- 16 ऑगस्ट 1955 रोजी सांगलीमध्ये तासगाव तालुकयातील अंजनी गावात जन्म
- प्राचार्य पी बी पाटील यांच्या शाळेत श्रमदान करुन शिक्षण
- सांगीलीतील शांतीनिकेतन महाविद्यालयात कला शाखेची पदवी आणि वकिलीचे शिक्षण पूर्ण
- उत्तम वक्ते आणि सामाजिक प्रश्नांची जाण असणारा नेता

राजकीय प्रवास
- 1979 ते 1990 पर्यंत जिल्हा परिषद सदस्य
- 1990 पासून सलग सहा वेळा आमदार
- ग्रामविकास मंत्रालयाची यशस्वी धुरा
- गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचं सर्वस्वी श्रेय आबांना
उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून आबा
महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून गोरगरीबांची पोर भल्या पहाटे
जीव तोडुन धावायची,आबा तुमच्या भरवशावर !
त्यांचा विश्वास सार्थक ठरला !
आबा तुम्ही गृहमंत्री असताना गोरगरीबांची हजारो पोर 'पैसा वशिला नसताना पोलीस दलात
भरती झाली !
*आजच्या तरुणानी कुणाच्या भरवशावर धावायच आता आबा ?

आबा आपण गेलात तरुणाचा आत्मविश्वासच हरवलाय...
आबांचा प्रवास : जिल्हा परिषद सदस्य ते उपमुख्यमंत्री
पूर्ण नाव - रावसाहेब रामराव ऊर्फ आर. आर. पाटील
जन्म - 16 ऑगस्ट 1957
जन्मगाव - अंजनी, ता. तासगाव, जि. सांगली
शिक्षण - बी.ए., एल.एल.बी.
जन्म - 16 ऑगस्ट 1957
जन्मगाव - अंजनी, ता. तासगाव, जि. सांगली
शिक्षण - बी.ए., एल.एल.बी.
प्रवास -
* आर. आर. पाटील 1979 मध्ये सांगली जिल्ह्यातील सावळजमधून जिल्हा परिषदेवर निवडून गेले.
* 1979 ते 90 या काळात त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केले.
* 1990 मध्ये ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडले गेले.
* त्यानंतर सातत्याने 1995, 1999, 2004, 2009 आणि 2014 या सर्व निवडणुकांमध्ये ते विधानसभेवर निवडून गेले. विधानसभेमध्ये सुरुवातीच्या काळात त्यांनी कॉंग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून काम पाहिले.
* त्याचबरोबर 1996-97 आणि 1998-99 या काळात त्यांनी विधीमंडळाच्या लोकलेखा समितीचे अध्यक्षस्थानही भूषविले.
* 1999 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासोबत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
* 1 नोव्हेंबर 2004 रोजी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
* 2003 ते 2008 आणि 2009 ते 2014 या काळात त्यांनी राज्याचे गृहमंत्री म्हणूनही काम सांभाळले.
* आर. आर. पाटील यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारले होते. या काळात त्यांनी जिल्ह्यामध्ये विविध विकासकामे करून नक्षलग्रस्त भागातील ग्रामस्थांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले.
* गृहमंत्री म्हणून काम करताना त्यांनी राज्यातील डान्सबार बंदीचा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे विविध सामाजिक स्तरांतून स्वागत करण्यात आले होते.

0 Comments