पंढरपूर लाईव्ह:-

दि. 7 फेब्रुवारी, 2015

 
मुंबई, दि.7: राज्य शासनाने 100 दिवसात निर्णयांना गती दिली असून लोकोपयोगी योजनांना चालना मिळाली आहे. लोकाभिमुख निर्णय घेत असतांनाच त्यावर सकारात्मक कार्यवाहीला प्राधान्य दिले जात आहे. सत्तेवर आल्यापासून किती कामे केली याच्या मुल्यमापनासाठी 100 दिवसांचा कालावधी तोकडा आहे. मात्र जनतेला विश्वास देऊ इच्छितो की आव्हान मोठे असले तरी शासन गतिमान झाले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र श्री. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या काळात घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती देण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहामध्ये पत्रकार परिषद झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.


मुख्यमंत्री म्हणाले की, जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आमचे शासन विविध क्षेत्रांमध्ये सकारात्मक निर्णय घेऊन वाटचाल करीत आहे. एखाद्या सरकारच्या मुल्यमापनासाठी 100 दिवस पुरेसे होत नाहीत. तरीही आम्ही या कालावधीत अनेक महत्वपूर्ण घेतले आहेत. शेतीसाठी शाश्वत योजना तयार करणे, आपल्या तक्रारींना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आपले सरकार हे वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे. मुंबईतील सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटिव्ही लावण्याबाबत एल ण्ड टी बरोबर आजच सामंजस्य करार करण्यात आला आहे. प्रशासकीय अधिकारांच्या विकेंद्रीकरणाचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. उद्योगासाठी सकारात्मक वातावरण तयार करण्यात आले आहे. महसूल विभागातर्फे लवकरच ई- मोजणीची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. गेल्या 15 वर्षात मंजूर झालेले विविध शहरांचे विकास आराखडे आणि आम्ही गेल्या तीन महिन्यांत मंजूर केलेले विकास आराखडे पाहता यात तिपटीचा फरक आहे.

 सेवा हमी विधेयकाचे प्रारूप जनमतासाठी ठेवण्यात आले असून माहिती अधिकार कायदा ऑनलाईन करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. न्यायदान प्रक्रियेला गती मिळावी यासाठी राज्यात न्यायाधीशांच्या 179 नवीन पदांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचबरोबर दोन नवीन न्यायवैद्यक प्रयोगशाळा (फॉरेन्सिक लॅब) सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 45 मोबाईल फॉरेन्सिक युनीट  तयार करून गुन्ह्यांच्या तपासाला गती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. रजेच्या दिवशी पोलिसांनी काम केल्यास त्यांना पूर्ण दिवसाचा  पगार, पोलिसांना घरे, चंद्रपूर येथे दारूबंदी असे महत्वपूर्ण  निर्णय या काळात घेण्यात आले आहेत.                

आरोग्याच्या क्षेत्रात टेलिमेडीसीनचा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनाने सुरू केला आहे. नवी मुंबईमध्ये पुनर्विकासाच्या कामांना गती यावी यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंटला
मान्यता देण्याबरोबरच त्यासाठी 4 चटईक्षेत्र निर्देशांक आणि मोडकळीस आलेल्या इमारतींसाठी 2.5 चटईक्षेत्र निर्देशांक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून 5 हजार गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी शासनाने पाऊन उचलले असून प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राज्यात 2800 ठिकाणी कामांना सुरूवात देखील करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा  देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून समाजातल्या सर्वच घटकांचा विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सरकारचा लेखाजोखा शंभर दिवसांचा’ या पुस्तिकेचे पत्रकार परिषदेस महसूलमंत्री एकनाथ खडसे, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता,
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, परिवहनमंत्री दिवाकर रावते, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, सामाजिक न्याय
राज्यमंत्री दिलीप कांबळे, ग्रामविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, गृहराज्यमंत्री राम शिंदे
आदींसह मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, सचिव मिलिंद म्हैसकर, प्रवीण दराडे, माहिती व जनसंपर्कच्या सचिव मनिषा म्हैसकर, महासंचालक चंद्रशेखर ओक आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अजय जाधव...7.2.2015

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>


 


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com   livepandharpur@gmail.com

 

 आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 8 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 51 हजार 739 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 3 हजार 714 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.