साहित्यीकांनी वंचित उपेक्षीतांची बाजु घेतलीच पाहिजे- प्रा. डॉ. कृष्णा इंगोले

पंढरपूर लाईव्ह:-

आम्ही जे जीवन जगतो, अनुभवतो त्याचा आणि साहित्याचा काहीच संबंध नव्हता. परंतु 1960 नंतर मात्र वेगळे प्रवाह निर्माण झाले. पण त्याची व्याप्ती वाढली नाही. त्यामुळे साहित्यीकांना माझे हेच सांगणे असते की, वंचीत उपेक्षीतांची बाजु घेणारे लिखाण आपल्या साहित्यात आलेच पाहिजे. असे मनोगत प्रा.डॉ.कृष्णा इंगोले यांनी व्यक्त केले. कासेगाव ता.पंढरपूर येथील सुपूत्र व मोडनिंब येथील महाविद्यालयातील प्रा.डॉ.वामन जाधव यांचा सत्कार ते मॉरिशस (मोका) येथे आंतरराष्ट्रीय साहित्य परिषदेत संत सावता माळी  यांच्या साहित्यावर शोधनिबंध सादर करुन आल्याबद्दल येथील हॉटेल विठ्ठल इन मध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

डॉ.वामन जाधव मित्रपरिवार व मसाप (महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पंढरपूर)  यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ ग्रामीण साहित्यीक डॉ.द.ता.भोसले हे होते. पुढे बोलताा इंगोले सर म्हणाले की, चिंतन, मनन व विचाराद्वारे साहित्यीकांनी स्वत:ला रचत जावे. तसेच डॉ.वामन जाधव यांनी समीक्षक न होता साहित्यीक म्हणूनच कामगिरी करावी कारण प्रतिभावान माणसाने समीक्षक बनू नये असे मला वाटते.
यावेळी जेष्ठ साहित्यीक प्रा.योगीराज वाघमारे (सोलापूर) म्हणाले की, डॉ.वामन जाधवांसारखा उपेक्षीत प्राध्यापक संत सावता सारख्या उपेक्षीत संताला सातासमुद्रापार नेतो ही अभिमानास्पद बाब आहे. साहित्यीकाने सध्याच्या काळात शेतकर्‍याच्या प्रश्‍नावर निव्वळ लिहीण्यापेक्षा तो आत्महत्या का करतोय याचा अभ्यास करुन त्यांचे प्रबोधन करावे. अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी डॉ.द.ता.भोसले म्हणाले की, सातत्याने लिखाण केल्याने नवखेपणाच्या खुणा नष्ट होतात. आपले साहित्य लोकाभिमुख व्हायचे असेल तर साहित्यीकांनी ज्ञानोपासना, कर्मोपासना, भक्तीसाधना व अनासक्तपणा या चार गुणाची वाढ केली पाहिजे. हे गुण प्रा.डॉ.वामन जाधव यांच्यामध्ये आहेत. ते प्रतिभावंत व प्रामाणिक साहित्यीक म्हणून नावारुपाला आले आहेत. नविन पिढीला त्यांचे मार्गदर्शन योग्य ठरेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमा च्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मंचकावर जेष्ठ पत्रकार सिध्दार्थ ढवळे, साहित्यीक प्रा.डॉ.सारीपुत्र तुपेरे, प्रा.नवनाथ पाटोळे, ना.बा.रत्नपारखी, प्रा.धनाजी चव्हाण व कवी रविराज सोनार हे उपस्थित होते. या कार्यक्रमास श्रीकांत कसबे, बा.ना.धांडोरे, आर.पी.कांबळे, दादासाहेब दोडके, प्रा.चांगदेव कांबळे, प्रा.देवानंद सोनटक्के, रत्नप्रभा पाटील, जैनुद्दीन मुलाणी, प्राचार्य शिवाजी बागल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदिप पांढरे, दादासाहेब खरात, राजेंद्र भोसले, विलास भोसले, लक्ष्मण मिसाळ, सोमनाथ ाजरे, प्रताप चव्हाण, अशोक माळी आदींनी विशेष परिश्रम घेतले.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

 


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com   livepandharpur@gmail.com

 

 आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 11 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 52 हजार 684  च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 3 हजार 802 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Post a Comment

0 Comments