विविध विषयांवर चर्चा :पंढरपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय
पंढरपूर लाईव्ह
स्टेशन रोड ते शहा पेट्रोलपंपाच्या रस्त्याच्या कडेने मिनी दुकान केंद्र बांधणे, नवीपेठ व झेंडा चौक येथील दुकान केंद्राच्या सुधारित अंदाजपत्रकास मंजुरी देणे व गाळ्याचे त्रिसदस्य समितीकडून मूल्याकंन करुन जाहीर लिलाव करुन गाळे त्याच लोकांना त्याच ठिकाणी देणे, अंबाबाई पटांगण येथील आ. क्र. 12 (अ), 13 येथे दुकाने बांधून खोकेधारकांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा साधना भोसले यांनी सांगितले.
चंद्रभागा वाळवंटात वाहने जाण्यासाठी बंदी, जनावरांना बंदी, बांधकाम करु नये या उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी वाळवंटात अनेक ठिकाणी कायमस्वरुपी बॅरिकेडिंग करण्यास व सूचना फलक लावण्यास पंढरपूर नगरपालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी घेण्यात आली.
यावेळी नगराध्यक्षा साधना भोसले, मुख्याधिकारी शंकर गोरे, प्रशासक बाळकृष्ण कदम, बांधकाम अभियंता अशोक माने, समशेर पठाण, नगरसेवक लक्ष्मण शिरसट, प्रताप गंगेकर, संजय घोडके, राहुल साबळे, सचिन डांगे, चंद्रकांत रणदिवे यांच्यासह अन्य नगरसेवक उपस्थित होते.

पंढरपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत 14 विषय घेण्यात आले. यामध्ये सुजल-निर्मल योजनेंतर्गत जल व ऊर्जा लेखापरिक्षण व सुधारणात्मक कामांतर्गत पंपिंग स्टेशन व पाण्याच्या टाक्यांच्या ठिकाणी इलेक्ट्रो मॅग्नेटिक वॉटर मीटर बसविण्याबाबत कार्यकारी अभियंता (ग्रा.) म. जि. प्रा. पुणे यांच्या 21 नोव्हेंबर 2014 रोजीच्या पत्रावर निर्णय घेण्यात आला. लाड, बर्वे व मलकानी यांच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना वारसा वशिला पद्धतीने सेवेत सामावून घेणे, 2015-16 या वर्षांसाठी विविध कामांच्या वार्षिक निविदा प्रसिद्ध करुन निविदा मागविणे, पंढरपूर मंजूर विकास योजनेतील 18 मी. रुंदीचा रस्ता संत गाडगेमहाराज चौक ते सांगोला चौक या भागातील दक्षिणेकडील रुंदी कमी करुन उत्तरेच्या बाजूने करणे तसेच मागील महिन्यात अतिक्रमण हटाव मोहिमेत बाधित झालेल्या झेंडा चौक, चप्पल लाईन, अंबाबाई पटांगण या परिसरातील खोकेधारकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत दोन्ही गटाकडून विषय मंजूर करण्यात आला.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. दि. 11 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 52 हजार 684 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 3 हजार 802
च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत
असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात
अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

0 Comments