मध्यवर्ती शिवजयंती जन्मोत्सव समितीची कार्यकारिणी जाहिर

पंढरपूर लाईव्ह:- पंढरपूर शहरात सर्व समाजातील संघटनांनी मिळून 19 फेब्रुवारी 2015 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती थाटामाटात करावी या भुमीकेतून छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती जयंती उत्सव समिती स्थापन करण्यात आली.

  या समितीचे अध्यक्ष म्हणून विशाल पवार यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष सुमीत शिंदे, कार्याध्यक्ष शंकर सुरवसे, खजिनदार सिध्दांत कदम, उपखजिनदार बालाजी अटकळे, सचिव ज्ञानेश्‍वर शिंदे, मिरवणुक प्रमुख सागर चव्हाण, महेश पवार आदी पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. या बैठकीस गोपी वाडदेकर, माजी नगरसेवक किरण घाडगे, धनंजय मोरे, स्वागत कदम, संग्राम काटकर, बंडु अटकळे, बंटी वाघ, किशोर मोळक, सुरज भोसले, युवराज भोसले, संतोष कवडे, विकी भोसले, जगदीश पवार, विश्‍वजीत भोसले, संदीप मांडवे, सागर कदम, प्रसाद सातपुते, मयुर कदम, अविनाश मोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. शिवरायांची भव्य मिरवणुक, विविध कार्यक्रम, व्याख्याने, पोवाडे असे भरगच्च कार्यक्रम यानिमित्ताने
 होणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष स्वागत कदम  यांनी दिली.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

 


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com   livepandharpur@gmail.com

 

 आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 11 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 52 हजार 684  च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 3 हजार 802 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Post a Comment

0 Comments